आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी तनूर येथे 7 मे रोजी झालेला बोट अपघात अत्यंत धक्कादायक असल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी न्याय स्वतः या प्रकरणाची सुनावणी करत आहे, असे कोर्ट म्हणाले. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन व न्यायमूर्ती शोभा अण्णामा इपेन यांनी यावेळी 'अधिकारी कुठे होते, काय करत होते?' असा सवालही उपस्थित केला.
केरळमधील मलप्पुरम येथे रविवारी पर्यटकांची बोट उलटून 22 जणांचा मृत्यू झाला. मृतांत 15 मुलांचाही सहभाग होता. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी होते. त्यांच्याकडे तेवढी लाइफ जॅकेट नव्हती.
बोट दुर्घटनेवरील हायकोर्टाच्या 3 टिप्पण्या
1. अधिकाऱ्यांनी बोटीला का जाऊ दिले?
हायकोर्टाने सांगितले की, "आम्ही याचिकेवर स्वतःच सुनावणी करू. नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका असणारी ही बोट चालवण्यास अधिकाऱ्यांनी परवानगी कशी दिली, हे आम्ही शोधू."
2. हाव-निष्काळजीपणा-क्रूरपणामुळे अपघात
न्यायाधीश म्हणाले, "मुलांचे निर्जीव मृतदेह पाहिल्यावर आमचे हृदय फाटले. अनेक रात्र आम्हाला झोप आली नाही. ही घटना म्हणजे निर्दयीपणा, लोभ व अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यांचा घातक मिलाफ आहे."
3. वारंवार भयानक अपघात
"अशा नाव दुर्घटना सातत्याने होत आहेत. हे अत्यंत भयावह आहे. 1924 मध्ये कोल्लमहून कोयट्टमला जाणारी एक बोट पालना येथे बुडाली. तेव्हा केरळने आपला महान कवी कुमारनासन गमावला," असे न्यायालयाने म्हटले आहे.
पाहा अपघाताची छायाचित्रे...
केरळ पोलिसांकडून एसआयटी स्थापन
मंगळवारी झालेल्या बोट दुर्घटनेच्या तपासासाठी केरळ पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. राज्याचे पोलिस प्रमुख अनिल कांत यांनी मलप्पुरम जिल्ह्याचे पोलिस प्रमुख सुजित दास यांना SIT चे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
PM मोदींकडून 2 लाख, केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून 10 लाखांची भरपाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्विटद्वारे या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले - केरळच्या मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्यामुळे मी दु:खी आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF मधून 2 लाख रुपये दिले जातील. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.