आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या मलप्पुरममध्ये पर्यटक बोट उलटली:15 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळच्या मलप्पुरममध्ये रविवारी रात्री डबलडेकर बोट उलटून 15 पर्यटकांचा मृत्यू झाला. या बोटीत सुमारे 40 पर्यटक होते. तनूरजवळ हा अपघात झाला. बचावकार्य सुरू आहे. थुवल थेराम पर्यटनस्थळी पुरपुझा नदीत सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये 6 मुले आणि 4 महिलांचा समावेश आहे. सुमारे 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बोटीवरील पर्यटक मलप्पुरम जिल्ह्यातील परप्पनगडी आणि तनूर भागातील होते. येथे बोट सेवा फक्त संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालवण्यास परवानगी आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती

बोटमधील प्रवाशांची संख्या बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 10 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार बोटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तसेच या बोटवर पुरेशी जीवरक्षक उपकरणेही नव्हती.

दरम्यान, घटनास्थळावर मदत व बचावकार्य राबवले जात आहे.