आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Monsoon | Monsoon Date 2021, Forecast Latest Update, Southwest Monsoon, Southwest Monsoon Kerala, IMD Latest News Update

मान्सूनचे आगमन झाले:2 दिवसांपूर्वी केरळमध्ये पोहोचला मान्सून, खासगी एजेंसी स्काय मेटची घोषणा; हवामान विभागाने अजुन पुष्टी केली नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • IMD चा अंदाज 31 ला पोहोचणार मान्सून

देशात मान्सूनची चाहूल लागली आहे. खासगी एजेंसी स्काय मेटने रविवारी सांगितले की, मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. सामान्यतः 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो. मात्र यावेळी मान्सून 31 मे म्हणजेच उद्या केरळमध्ये पोहोचणार आहे.

स्काय मेटचा मान्सून ट्रॅकर

  • स्काय मेटने मान्सून 30 मेला केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज लावला होता. त्यानुसार, मान्सून सामान्य गतीपेक्षा पुढे वाढत आहे.
  • अंदमान-निकोबार बेटांवर आपली ठरलेली तारीख 21 मेला चाहूल दिल्यानंतर मान्सून सलग उत्तर-पश्चिमी दिशेने पुढे सरकत आहे.
  • 24 मे रोजी ते श्रीलंकेच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर पोहोचला होता आणि पुढील तीन दिवसांत श्रीलंकेच्या उत्तरेकडील टोकाजवळ पोहोचले.
  • 27 मे रोजी मान्सूनने मालदीवलाही पार केले आहे. तेव्हा मान्सून केरळ किनाऱ्या जवळून जवळपास 200 किलोमीटर दूर होता.
  • यास आणि तौक्ते वादळामुळेही देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये पाऊस झाला. यानंतर 30 मेला स्काय मेटने मान्सून येण्याची घोषणा केली.

IMD चा अंदाज 31 ला पोहोचणार मान्सून
हवामान विभागाचा अंदाज आहे की, मान्सून उद्या केरळच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. केरळमध्ये मान्सून पोहोचण्याची सामान्य तारीख ही एक जून आहे, मात्र हवामान विभागाने मान्सून 31 मेलाच येणार असल्याची भविष्यवाणी करत 4 दिवस प्लस-मायनस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...