आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळमध्ये मंगळवारी पॅराग्लायडिंग करताना मोठा अपघात सुदैवाने टळला. तिरुअनंतपुरममधील वर्कला येथे पॅराग्लायडिंग करताना एक महिला (28) आणि तिचा पुरूष ट्रेनर(50) हे दोघेही 50 फूट उंच असलेल्या विद्युत खांबामध्ये अडकले. त्यानंतर दोन तासांच्या प्रयत्नानंतर दोघांना सुखरूप खाली उतरविण्यात आले. तर दोघांना किरकोळ जखम झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, दोघेही सुखरूप आहेत.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघेही पॅराग्लायडिंग करत असल्याचे दिसून येत आहेत. उतरताना त्यांचे पॅराशूट विजेच्या खांबात अडकले. खांबाच्या वर अनेक हाय-व्होल्टेज तारा होत्या. दोन्ही पॅराग्लायडर 50 फुटांपेक्षा जास्त उंचीवर खांबावर लटकले. जीवाचा थरकाप उडवणारी ही घटना वर्कला येथील पापनाशम बीचवर घडली.
2 तास खांबाला लटकले
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते, परंतु अग्निशमन विभागाकडे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतकी लांब शिडी नव्हती. यामुळे दोघांना सुमारे दोन तास खांबाला लटकट राहावे लागले.
दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून खांबाखाली गाद्या आणि जाळी ठेवण्यात आली होती. अथक प्रयत्नानंतर महिला आणि पॅराग्लायडिंग ट्रेनरची सुटका करण्यात आली. दोघांना वर्कला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे.
पॅराग्लायडिंग सरावादरम्यान यापूर्वीही अपघाताच्या घटना
पॅराग्लायडिंग दरम्यान अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी 24 तासांत पॅराग्लायडिंगच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात पॅराग्लायडिंग करताना पडून दक्षिण कोरियातील एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी भागात पॅराग्लायडिंग करताना महाराष्ट्रातील 30 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.