आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयन सरकारने केली कारवाई:केरळ पोलिसांचा एशियानेट न्यूजच्या कार्यालयावर छापा

तिरुवनंतपुरमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ पोलिसांनी रविवारी एशियानेट न्यूजच्या कोझिकोड कार्यालयावर छापा टाकला. ही छापेमारी डावे अपक्ष आमदार पी.व्ही. अनवर यांच्या तक्रारीच्या आधारावर करण्यात आली. राज्यात पी.विजयन सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर माकपा एशियानेट न्यूजला निशाणा बनवत असल्याचा आरोप आहे.

वाहिनीने कुख्यात सोने तस्करी रॅकेटच्या आरोपी स्वप्ना सुरेश आणि राज्य सरकार यांच्यातील साटेलोट्याचा पर्दाफाश केला आहे. एशियानेट न्यूजचे अध्यक्ष, राजेश कालरा म्हणाले, केरळ पोलिस सध्या एका कपोलकल्पित प्रकरणात कोझिकोडमध्ये एशियानेट कार्यालयावर छापा टाकत आहे. ही कारवाई दुसऱ्या दिवशी आमच्या कोची कार्यालयात एसएफआयच्या विघटनकारी कृत्यानंतर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...