आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आश्चर्यकारक:केरळ : 29 दिवस क्वॉरंटाइन राहून बाधित, कुटुंबातील चारही जण आढळले पॉझिटिव्ह!

तिरुवनंतपुरम/ डेहराडूनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • उत्तराखंड : ९ महिन्यांचे बाळ बाधित, तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून परतले होते वडील

केरळमध्ये २९ दिवस विलगीकरणात राहिलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती आपल्या भावासोबत दुबईहून परतली होती. दोघांना कोझिकोड जिल्ह्यातील एका केंद्रात विलगीकरणात ठे‌वण्यात आले होते. यांच्या कुटुंबातील इतर ४ जणदेखील बाधित आहेत. यात दोन भाऊ व वडिलांंचा समावेश आहे.जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. जयश्री यांनी सांगितले, अशी प्रकरणे खूपच कमी असतात. दुसरीकडे उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे ९ महिन्यांच्या बाळाला कोरोना झाला आहे. बाळाचे वडीलही संसर्गित आहेत. ते तबलिगी जमातच्या कार्यक्रमातून परतले होते. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. मात्र कार्यक्रम कुठे झाला होता, याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. येथे सैन्याच्या रुग्णालयात तैनात एका महिला अधिकारी आणि नैनिताल जिल्ह्यात तबलिगी जमातच्या एक सदस्यालाही लागण झाली आहे.

आपल्या राज्यांची विविध देशांशी बरोबरी, युद्धात अग्रेसर

 • राज्य/देश - लोकसंख्या (कोटी) - रुग्ण
 • महाराष्ट्र - 12.30 - 3320
 • जपान - 12.30 - 9787
 • दिल्ली - 20.00 - 1707
 • श्रीलंका - 20.00 - 248
 • तामिळनाडू - 75.00 - 1372
 • इराण - 75.00 - 80868
 • मध्य प्रदेश - 8.30 - 1360
 • जर्मनी - 8.30 - 141397
 • राजस्थान - 6.80 - 1282
 • ब्रिटन - 6.80 - 1,03,093
 • गुजरात - 6.80 - 1272
 • थायलंड - 6.80 - 2672
 • उत्तर प्रदेश - 23.00 - 969
 • पाकिस्तान - 23.00 - 6970
 • तेलंगण - 3.50 - 766
 • सौदी अरेबिया - 3.50 - 6450
 • आंध्र प्रदेश - 5.20 - 603
 • द. कोरिया - 5.20 - 10640
 • केरळ - 3.40 - 399
 • उझबेकिस्तान - 3.40 - 1368
बातम्या आणखी आहेत...