आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसवरील जाहिरात प्रकरण:केरळमध्‍ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरील जाहिरात प्रकरण सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळ राज्य परिवहन महामंडळाच्या(केएसआरटीसी) बसमधील जाहिरातींबाबत सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने केएसआरटीसीच्या बसमधील जाहिराती काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्याला केएसआरटीसीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. बसमधील जाहिरातीसंदर्भातील प्रस्ताव घेऊन यावे,त्यावर सोमवारी सुनावणी करू,असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्ट केएसआरटीसीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत आहे.

केरळ उच्च न्यायालयाच्या एर्नाकुलम खंडपीठाने ९ डिसेंबर २०२२ आणि १४ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशात नमूद केले की, केएसआरटीसीच्या निलक्कम-पम्बादरम्यान धावणाऱ्या २-३ बस जाहिरातींनी लपटलेल्या आहेत. त्यांचा यात्रेकरूंसाठी वापर होत नाही. सार्वजनिक ठिकाणी वाहतूक करणाऱ्या केएसआरटीसी व केयूआरटीसीच्या बस जाहिरातींनी झाकल्या असतात. जाहिराती डकवल्यामुळेे विंडस्क्रीन काच, रिअर विंडो व साइड विंडोच्या दृश्यमानतेवर परिणाम होतो. याशिवाय अन्य चालकांचे लक्ष विचलित करणाऱ्या जाहिराती, चित्रांवरही कारवाई केली जाईल,असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...