आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द केरला स्टोरी' या चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये बंदी घालण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 12 मे रोजी सुनावणी होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्याने ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांचे वकील हरीश साळवे यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली.
केरळ उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिल्याच्या विरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने सुनावणीसाठी १५ मे ही तारीख निश्चित केली आहे. साळवे यांच्या याचिकेवर त्याच दिवशी सुनावणी घेण्यासही खंडपीठाने सांगितले. मात्र बंदीमुळे आम्हाला दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचे साळवे यांनी सांगितले, त्यानंतर न्यायालयाने 12 मे रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले.
हे ही वाचा
द केरला स्टोरीचा वाद:बंदीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी, आधी म्हटले होते- चित्रपट चांगला की वाईट हे बाजार ठरवेल
'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी मंगळवारी या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची विनंती सरन्यायाधीशांकडे केली. यानंतर न्यायालयाने सुनावणीसाठी 15 मे ही तारीख निश्चित केली आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने म्हटले होते- चित्रपट चांगला आहे की नाही, हे मार्केट ठरवेल. - येथे वाचा संपूर्ण बातमी
बॉक्स ऑफिस कलेक्शन:'द केरला स्टोरी'ची यशस्वी घौडदौड सुरू, कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला ‘एवढ्या' कोटींचा गल्ला
विपुल शहांची निर्मिती असलेले आणि सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. प्रदर्शित होण्याआधीपासून वादात सापडलेल्या या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा चांगलाच फायदा होताना दिसतोय. चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यापासून चांगली कमाई करत आहे. वीकेंडला चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून तीन दिवसांत चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
योगी सरकारचा निर्णय:UP मध्ये 'द केरला स्टोरी' चित्रपट टॅक्स फ्री, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळासह पाहणार चित्रपट
'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन आता राजकारण तापू लागले आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घातली जात आहे, तर दुसरीकडे काही ठिकाणी या चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमध्येही हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः ट्विट करून चित्रपट करमुक्त केल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह मंगळवारी (9 मे) विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट पाहू शकतात, असे सांगितले जात आहे. येथे वाचा सविस्तर बातमी
बॅन:'द केरला स्टोरी'वर तामिळनाडू पाठोपाठ आता प. बंगालमध्येही बंदी, ममता बॅनर्जी सरकारचा निर्णय
विपुल शाह यांची निर्मिती असलेल्या 'द केरला स्टोरी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र प्रदर्शनाआधीपासूनच निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. अनेक संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. तर काहींनी चित्रपटाला पाठिंबा दर्शवला. काही राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला, तर काहींनी मात्र त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली. आधी तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. आता त्या पाठोपाठ ममता बॅनर्जी सरकारनेही चित्रपटावर बंदी आणली आहे. येथे वाचा सविस्तर बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.