आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामार्च महिन्याच्या सुरुवातीलाच केरळमध्ये वाढलेल्या भीषण उष्णतेमुळे सामान्यांना धडकी भरली आहे. केरळच्या काही भागात विक्रमी 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेची महाभयंकर लाट बघता सामान्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
काही भागात तापममान 54 अंशांवर
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी तयार केलेल्या एका अहवालात म्हटले की राज्यातील काही भागात तापमान 54 अंश सेल्सिअसच्याही पुढे नोंदवण्यात आले. प्राधिकरणानुसार इतके तापमान अतिशय घातक आहे. यामुळे गंभीर आजार आणि हीट स्ट्रोकचा धोका अनेक पट वाढू शकतो.
प्राधिकरणानुसार केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्याच्या दक्षिणेकडील अलापुझ्झा, कोट्टायम, कन्नूर जिल्ह्यांतील काही भागांत तापमान 54 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले. तिरुअनंतपुरम, कोल्लम, अलापुझ्झा, कोट्टायम, एर्नाकुलम, कोझिकोड आणि कन्नूरमध्ये गुरुवारी तापमान 45 ते 54 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवण्यात आले. या ठिकाणी दीर्घ काळ उष्णतेची लाट राहील असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
IMD च्या अधिकाऱ्यांनी भाष्य करणे टाळले
मात्र तिरुअनंतपुरममधील भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अहवालावर भाष्य करणे टाळले आहे. कासरगोड, कोझिकोड, मलप्पुरम, कोल्लम, पठानमथिट्टा आणि एर्नाकुलममधील तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअशपर्यंत पोहोचले आहे. तर इडुक्की आणि वायनाडच्या डोंगराळ भागात तापमान 29 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले आहे.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.