आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेरळच्या कोझिकोडमध्ये रविवारी एक्सप्रेस रेल्वेत चढण्यावरून 2 प्रवाशांत वाद झाला. त्यानंतर एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत 3 प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला असून, 9 जण जखमी झालेत. पोलिसांनी सांगितले की, मृतांत एका महिला व मुलासह पुरुषाचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह रात्री उशिरा इलाथूर रेल्वे स्थानकाच्या रुळावरून जप्त करण्यात आले.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात असून, त्याचा शोध सुरू आहे. मृतांत मत्तन्नूरच्या रहमत, त्याची बहीण व 2 वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर जखमी प्रवाशांत थलासेरीच्या अनिल कुमरा, त्यांची पत्नी सजीशा, त्यांचा मुलगा अद्वैत व कन्नूरच्या रूबी व त्रिशूरच्या राजकुमार यांचा समावेश आहे. या सर्वांवर कोझिकोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रेल्वेच्या रुळावर आढळले तिघांचे मृतदेह
पोलिसांनी सांगितले की, अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्यूटिव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री 9.45 वा. ही घटना घडली. रेल्वेने कोझिकोड क्रॉस करताच 2 प्रवाशांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यात एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला पेटवून दिले. यामुळे अन्य प्रवाशांनी चेन ओढून रेल्वे थांबवली व घटनेची पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना प्रवाशांनी सांगितले की, एक महिला व मुलगा रेल्वेतून बेपत्ता आहे. पोलिसांनी या दोघाचाही शोध सुरू केला आहे. दुसरीकडे, रेल्वे स्थानकाच्या रुळावर महिला, मुलगा व एका पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या मते, आग लागल्यामुळे या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल किंवा ते रेल्वेतून पडले असतील. दुसरीकडे, आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस आसपासच्या सीसीटीव्हीची मदत घेत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.