आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kerala Train Fire Case Update; Shahrukh Saifee Arrested | Maharashtra | Ratnagiri

कारवाई:अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जाळल्याचा आरोपी शाहरुखला रत्नागिरीतून अटक; महाराष्ट्र एटीएसने पकडले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमधील अलप्पुझाहून कन्नूरला जाणाऱ्या ट्रेनला आग लावणाऱ्या शाहरुख सैफी या आरोपीला महाराष्ट्रातील रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखला मंगळवार-बुधवारी मध्यरात्री महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले. आरोपीच्या डोक्याला व चेहऱ्यावर जखमा झाल्या असून तो रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी गेला होता.

आरोपींन अटक केल्याबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्र सरकार, रेल्वे पोलिस दल आणि NIA यांचे आभार मानले आहेत.

केरळ पोलिस शाहीनबागमध्ये आरोपीच्या घरी पोहोचले

केरळ पोलिसांचे एक पथक रत्नागिरीत पोहोचले आहे. ते त्याला केरळला घेवून जातील. शाहरुख हा दिल्लीच्या शाहीन बागचा रहिवासी आहे. तपासासाठी केरळ पोलिसांचे एक पथक त्याच्या घरी देखील पोहोचले होते.

केरळ पोलिसांचे पथक तपासासाठी शाहीन बाग येथील आरोपीच्या घरी गेले होते.
केरळ पोलिसांचे पथक तपासासाठी शाहीन बाग येथील आरोपीच्या घरी गेले होते.

रविवारी रात्री झाला होता 3 जणांचा मृत्यू

रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसच्या D1 कोचला शाहरुख सैफीने आग लावली आणि अनेक प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ फेकले. कोझिकोडमधील एलाथूरजवळ ही घटना घडली. या घटनेत एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगीपासून वाचण्यासाठी त्यांनी ट्रेनमधून उडी मारली. या घटनेत आणखी 9 जण जखमी झाले आहेत. यापैकी फक्त एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

प्रवाशांना पेटवून आरोपी दुचाकीवरून पळून गेल्याचे सीसीटीव्हीवरून समोर आले आहे.
प्रवाशांना पेटवून आरोपी दुचाकीवरून पळून गेल्याचे सीसीटीव्हीवरून समोर आले आहे.

तपासासाठी 18 सदस्यांची एसआयटी स्थापन

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केरळ पोलिसांनी 18 सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना आरोपीची बॅग रेल्वे रुळावर पडलेली दिसली. त्यात एक सिम नसलेला मोबाईल, एक वही, पेट्रोल सारख्या द्रवाने भरलेली बाटली, कपडे इत्यादी आढळून आले. त्याद्वारे आरोपींची ओळख पटली होती.