आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी लढा:केरळ, व्हिएतनामचा कुशल आरोग्य यंत्रणेमुळे कोरोनावर विजय

नवी दिल्ली / हनोईएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कमी खर्च, कमी हानीसह प्रादुर्भावाला रोखले

फोनची रिंग वाजते आणि तिकडून एक डॉक्टर बोलू लागतात. घाबरलेल्या स्वरात ‘सर, व्हेंटिलेटर कमी पडत आहे आणि रुग्णसंख्या तर वाढतेय. काय करावे? ’ ते विचारणा करतात. आपली लढाई गंभीर आजाराशी सुरू असून त्यात चारपैकी तीन जणांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यावर लस किंवा आैषध आलेले नाही, याची डॉक्टरांना पूर्ण कल्पना आहे. कोविड-१९ च्या सुरूवातीला अशा प्रकारचे संभाषण सामान्य होते. परंतु आता बहुतांश ठिकाणची परिस्थिती बदलली आहे. कोरोनाचा रुग्ण आढळलेले केरळ भारतातील पहिले राज्य. वुहानमधून जानेवारीत एक विद्यार्थी केरळात परतला होता. त्यानंतर काही दिवसांतच केरळने नियंत्रण मिळवले. म्हणूनच कोरोनाच्या उच्चाटनासाठी सुरू असलेल्या लढाईत केरळची कहाणी मल्याळम चित्रपटांसारखीच आहे अशी म्हणावी लागेल. म्हणजे- अॅक्शन, स्टाईल, थ्रिलर. २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा तेथे सर्वाधिक कोरोना रुग्ण होते. पण ६ आठवड्यांत राज्य १६ व्या क्रमांकावर आले आहे. केरळने संचारबंदी, संपर्कातील तपासणी, संसर्गाची लक्षणे असलेल्या लोकांना क्वारंटाईन करून कोरोना विरोधातील लढाई लढली. केरळसारखीच संहिता त्यापेक्षा तीनपट जास्त म्हणजे ९.५ कोटी लोकसंख्या असलेल्या व्हिएतनामचीही आहे. परंतु व्हिएतनामने केलेली कामगिरी जास्त चकीत करणारी ठरते. व्हिएतनाममध्ये २००३ मध्ये सार्स होता. २००९ मध्ये स्वाईन फ्लूचाही अनुभव होता. व्हिएतनामचे संंसर्गजन्य आजार तज्ञ टॉड पोलक म्हणाले, आमच्या यशाचे कारण सामान्य आहे. आम्ही सुरूवातीपासून वेगाने व आक्रमकपणे हालचाली केल्या. सिद्ध पद्धतींचा वापर केला.

प्रादुर्भाव रोखणाऱ्या पद्धती

केरळने एक लाख लोकांना क्वाॅरंटाइन केले. निगराणीसाठी १६ हजार कुशल टीम तयार केल्या. गावागावापर्यंत हँड वॉशिंग केंद्र उपलब्ध करून दिले. जेवण, आैषधींची व्यवस्था केली. अधिकारी लोकांच्या संपर्कात राहिले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूर, लाखो घरांमध्ये मोफत जेवण, आवश्यक गोष्टी पोहोचवल्या. व्हिएतनाममध्ये प्रवासावर बंदी होती. लॉकडाऊनही केले. लष्करालाही तैनात केले. जास्त तपासण्या केल्या. हनोईमध्ये ५ हजार लोकांची तपासणी झाली. कुशल यंत्रणेमुळे दोन्ही ठिकाणी यश मिळाल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...