आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • KGF Song Copyright Case; Karnataka HC Stays Fir Against Rahul Gandhi | Bharat Jodo Yatra Video

KGF साँग कॉपीराइट प्रकरण:कर्नाटक हायकोर्टाची राहुल गांधी, जयराम रमेश, सुप्रिया श्रीनेत विरोधातील FIRला स्थगिती

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

KGF चित्रपटातील गाण्याच्या कॉपीराइट उल्लंघनाप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश व सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधातील FIR ला स्थगिती दिली आहे. काँग्रेस नेत्यांविरोधात एमआरटी म्यूझिक कंपनीने यासंबंधीची तक्रार दाखल केली होती. या कंपनीकडे ‘केजीएफ चॅप्टर 2’च्या हिंदी व्हर्जनच्या राइट्स आहेत.

बंगळुरू स्थित कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधींनी आपल्या भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनसाठी KGF-2चे गाणे -'समुंदर में लहर उठी है जिद्दी जिद्दी है तूफान चट्टानें भी कांप रही है जिद्दी जिद्दी है तूफान'चा वापर केला.

कंपनीने ‘केजीएफ-2च्या साउंडट्रॅकचे हक्क प्राप्त करण्यासाठी मोठ्या पैशांची गुंतवणूक केली. पण काँग्रेसने आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी आमच्या परवानगीशिवाय आपल्या प्रचाराच्या व्हिडिओत या साउंडट्रॅकचा वापर केला. यामुळे आमचे मोठे नुकसान झाले.’

या कलमांतर्गत दाखल झाला FIR

राहुल गांधी, जयराम रमेश व सुप्रिया श्रीनेत्र यांच्याविरोधात भादंवि कलम 403 (मालमत्तेचा गैरवापर), 465 (फसवणूक), 120 B (गुन्हेगारी कट) व कलम 63 कॉपीराइट कायदा-1957 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

KGF साँग कॉपीराइट उल्लंघनाशी संबंधित ही बातमी वाचा...

राहुल गांधींवर संगीत चोरल्याचा आरोप:भारत जोडो यात्रेत KGF-2 चे संगीत वापरले, कंपनीने राहुल गांधीसह तिघांवर गुन्हा दाखल केला

राहुल गांधी यांच्या विरोधात कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. KGF-2 ची म्युझिक लेबल कंपनी MTR ने ही केस दाखल केली आहे. भारत जोडो यात्रेच्या प्रमोशनमध्ये राहुल यांनी KGF-2 चे गाणे वापरले आहे. ''समुंदर में लहर उठी है, ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान चट्टानें भी काँप रही है, ज़िद्दी ज़िद्दी है तूफ़ान..." हे गाणे वापरले असल्याचा कंपनीचा आरोप आहे. त्यासाठी त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. संपूर्ण बातमी वाचा...

बातम्या आणखी आहेत...