आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Khabad House, The Shrine Of Israeli Tourists In The Security Circle; Two Security Guards Deployed 24 Hours

इस्रायल-हमास संघर्षात अजमेर अलर्ट:सशस्त्र जवानांच्या सुरक्षेत इस्रायली धर्मस्थळ खबाद हाउस; 24 तास जवान तैनात

अजमेर / सुनिल कुमार जैन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पुष्करमधील इस्रायलचे धर्मस्थळ, खबाद हाऊसची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. RAC (राजस्थान सशस्त्र कॉन्सटबुलरी) चे सशस्त्र जवान 24 तास या परदेशी धर्मस्थळाच्या बाहेर पाहारा देत आहेत. तसेच सीसीटीव्हीद्वारेही यावर नजर ठेवण्यात येत आहे. व्यवस्थापक हनुमान बाकोलिया म्हणाले की, येथे लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी आहे. सध्या येथे कोणीही राहत नाही.

गेल्या एक वर्षापासून येथे कुलूप लावलेले आहे. नजीकच्या भविष्यात देखील हे उघडण्याची शक्यता नाही. यामागचे कारण म्हणजे कोरोनामुळे इस्रायली धर्मगुरू परत आलेले नाहीत. उन्हाळ्यात ते खबाद हाऊस बंद करून घरी जातात. हे पाच महिने बंद राहते आणि नंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा उघडते. कोरोनामुळे ते अद्याप परतलेले नाहीत. यावर्षी खबाद हाऊसभोवती एकही पर्यटक दिसला नाही.

वेळोवेळी तपासली जाते सुरक्षा यंत्रणा
दहशतवाद्यांच्या हिट लिस्टमध्ये खबाद हाऊसचाही समावेश आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीने याची रेकी केली होती. हेडली हल्ला करण्यात यशस्वी झाला नाही, परंतु सरकारने खबाद हाऊसची सुरक्षा वाढवली. खबाद हाऊसची सुरक्षा तपासण्यासाठी पोलिस व सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी वेळोवेळी येत राहतात.

बातम्या आणखी आहेत...