आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये तळ ठोकून बसलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना पुढील रणनीतीची माहिती नव्हती. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांच्याशी सकाळी चर्चा केल्यानंतर विशेष विमानाने सर्व बंडखोर आमदार दिल्लीत भाजप नेतृत्वाला भेटायला जाणार होते. त्यासाठी सुरतमध्ये चार विशेष विमाने सज्ज होती. ठाकरे सरकार अल्पमतात आणण्यासाठी बंडखोर आमदारांनी राजीनामा द्यावा, असा निराेप भाजपकडून देण्यात आला. एकनाथ शिंदेंनीही ताे आमदारांना कळवला.
मात्र पुन्हा निवडून येण्याबाबत साशंक असलेल्या बहुतांश आमदारांनी राजीनाम्याचा प्रस्ताव नाकारला. त्यावरून शिंदे व काही आमदारांत खडाजंगीही झाली. राजीनामा दिल्यास काय ‘भरपाई’ मिळणार यावरूनही बराच खल सुरू होता. ही चर्चा उशिरापर्यंत चालली. त्यामुळे दिल्लीकडे जाणाऱ्या ४ वाजताच्या विशेष विमानाची वेळ लांबवावी लागली. शिंदेंसाेबत आलेल्या ३५ पैकी ठाकरे सरकार अल्पमतात येण्यासाठी आवश्यक असलेल्या १० ते १५ आमदारांनीच राजीनामा द्यावा, असाही पर्याय या चर्चेत समाेर आला. मात्र अजून अडीच वर्षे बाकी असताना आमदारकी साेडण्यास हे १५ आमदार तयार नाहीत. म्हणून सरकार बरखास्त न करता, किंवा आमदारकीचा राजीनामा न देता शिंदेंच्या नेतृत्वात वेगळा गट स्थापन करून फडणवीस यांचे सरकार सत्तारूढ व्हावे, यासाठी आमदार आग्रही होते. दिल्लीच्या बैठकीतही याच मुद्द्यावर बंडखोर आमदार भर देणार असल्याचे सांगितले जाते.
तत्पूर्वी बुलडाण्याचे आमदार नितीन देशमुख व शिंदे यांच्यातही वाद झाला. त्यानंतर देशमुख यांना सूरतच्या रुग्णालयात अॅडमिट करावे लागले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.