आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओटीटीवरील वेबसिरीज ‘खाकी : द बिहार चॅप्टर’मध्ये एक संवाद आहे- ड्यूटी प्रामाणिकपणे करा, बाकी सगळे तर मिळतेच. समाजातील बदलासाठी पोलिसांची वर्दीच सशक्त करते. “पॉवर डझंट करप्ट पीपल, पीपल करप्ट पॉवर.’ प्रामाणिकपणा पोलिस विभागाचा मौल्यवान दागिना आहे. हा कधी कधी ओढला जातो. वेबसिरीज आयपीएस अमित लोढांचे पुस्तक “बिहार डायरिज : द ट्रू स्टोरी आॅफ हाऊ बिहार इज मोस्ट डेंजरस क्रिमिनल वाज कॉट’वर बेतली आहे. याद्वारे प्रकाशझोतात आलेल्या लोढांवर आता स्पेशल व्हिजिलन्स युनिटने (एसयूव्ही) लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोढा यांच्यावर आरोप आहे की, मगध विभागात आयजी असताना फ्राइडे स्टोरी टेलर्स एलएलपी व इतरांसोबत साटेलोटे करत अवैध कमाई केली. लोढा यांनी अफाट स्थावर-जंगम मालमत्ता जमा केली. ही त्यांच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त आहे. त्यांच्यावर नोकरीत असताना व्यवसाय करणे आणि गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप आहे.
पोलिसांच्या गुन्हेगारी शाखेकडून दाखल तक्रारीत म्हटले की, लोढानी सेवेत असताना प्रोडक्शन हाऊस फ्रायडे स्टोरी टेलरसोबत करार केला होता. हा १ रुपयांत झाला. मात्र, पोलिसांनी दावा केला की, लोढांच्या पत्नीच्या खात्यात ४९ लाख रुपयांची देवाण-घेवाण झाली होती. पोलिस सूत्रांनुसार, प्रोडक्शन हाऊससोबत डील फायनल होण्याआधी पत्नीच्या खात्यात काही पैसे जमा केले होते. तक्रारीनुसार, अमित लोढा प्रस्थापित कथाकार नाहीत. त्यांनी पुस्तक लिहिणे व व्यावसायिक उद्देशासाठी मंजुरी घेतली होती. याकडे डोळेझाक करत त्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी १ पुस्तक “बिहार डायरी’चा वापर केला.
मद्य तस्करीच्या वादातून तार जोडले गेले मगध विभागाचे आयजी असताना अमित लोढा व गयेचे तत्कालीन एसएसपी आदित्य कुमार (फरार आहेत) यांच्यात मद्य तस्करीच्या आरोपीवरून वाद झाला. प्रकरणाची चौकशी आयपीएस पी.के. कन्नन यांनी केली. याच्या अहवालात लोढा यांच्यावर मध्यस्थामार्फत खंडणी घेतल्याचा दुजोरा मिळाला. प्रकरणाची चौकशी डीएसपी चंद्रभूषण यांना दिली आहे. लोढा सध्या स्टेट क्राइम रेकॉर्ड ब्युरोत आयजी आहेत. दुसरीकडे, गुन्हा दाखल होताच लोढा यांनी स्वत:वर आणि सिस्टिमवर विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे, आदित्यकुमार यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीचा खटला दाखल केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.