आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यादरम्यान प्रेक्षकांना धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी 2 खलिस्तानी समर्थकांना अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या सायबर सेलने या दोघांना मध्य प्रदेशातील सतना आणि रीवा येथून अटक केली आहे.
सायबर सेलने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानीज गुरुवारी चौथ्या सामन्याला उपस्थित होते. त्यानंतर या दोन खलिस्तान समर्थक आरोपींनी अॅडव्हान्स सिम बॉक्स तंत्राचा वापर करून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये न येण्याची धमकी दिली होती.
प्री-रेकॉर्ड केलेल्या संदेशात लोकांना इशारा देण्यात आला होता की, 'घरीच राहा, सुरक्षित राहा'. हा संदेश खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या आवाजात इंग्रजीमध्ये रेकॉर्ड करण्यात आला होता. टेलीमार्केटिंग पद्धत वापरून ही धमकी अनेक लोकांना पाठवण्यात आली होती.
पाकिस्तानातून आल्या होत्या धमक्या
सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, धमक्यांची तक्रार आल्यानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली. अॅडव्हान्स सिम बॉक्स ट्रेस करणे कधी-कधी शक्य नसते. तरीही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमधील आरोपींचे लोकेशन शोधण्यात आम्हाला यश आले. त्यादिवशी पाकिस्तानात कार्यरत असलेल्या बनावट ट्विटर हँडलवरूनही धमक्या आल्या होत्या.
खेळाडूंची सुरक्षा वाढवली
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी क्रिकेट संघ, त्यांचे हॉटेल आणि स्टेडियममधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पोलिसांनी स्टेडियम आणि दोन्ही देशांच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली आहे.
अमृतसरच्या G-20 शिखर परिषदेवरूनही धमकी
गुरुपतवंत सिंग पन्नू याने अमृतसर येथे होणाऱ्या जी-20 देशांच्या शिखर परिषदेबाबतही धमकी दिली आहे. सोशल मीडिया हे त्याचे माध्यम बनले. देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. चार दिवसांपूर्वी पंजाबमधील अमृतसर येथे होणाऱ्या जी-20 परिषदेपूर्वी शीख फॉर जस्टिसचा गुरपतवंत सिंग पन्नू याने खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करायला लावली होती. वेरक बायपासवर या घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजीसोबतच पन्नूने देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना धमकी देणारे व्हिडिओही जारी केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.