आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये पुन्हा खलिस्तान जिंदाबादचे नारे घुमत आहेत. यावेळी फिरोजपूरच्या विभागीय रेल्वे मॅनेजर अर्थात डीआरएम कार्यालयाच्या भिंतीवर हे नारे लिहिण्यात आलेत. प्रतिबंधित अतिरेकी संघटना 'सिख फॉर जस्टिस'चा (एसएफजे) म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नूने स्वतः यासंबंधीचा एका व्हिडिओ व्हायरल केला. याची खबर मिळताच पोलिसांनी पेंटच्या मदतीने हे नारे पुसून टाकले. या घटनेमुळे पंजाब पोलिस व सुरक्षा यंत्रणांची काळजी वाढली आहे.
फिरोजपूरमधील DRM कार्यालयाच्या भिंतीवर लिहिण्यात आले खलिस्तान जिंदाबादचे नारे. ते एसएफजे म्होरक्या पन्नूने शेयर केले.
पन्नूने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करुन व्हिडिओ टाकला
सोमवारी सकाळी 8.42 वा. गुरपतवंत सिंग पन्नूने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला. त्यात काही पत्रकारांचा समावेश करुन व्हिडिओ टाकला. त्यात पन्नूने हे नारे उपायुक्तांच्या घरी किंवा कार्यालयाच्या बाहेर लिहिण्यात आल्याचे नमूद केले. त्यानंतर त्याची पडताळणी केली असता ते डीआरएम कार्यालयाच्या बाहेर लिहिल्याचे आढळले. पोलिसांनी डीसी कार्यालयाच्या बाहेरही याचा धुंडाळा घेतला.
खलिस्तानी नाऱ्यांसह एसएफजेही लिहिण्यात आले आहे. पोलिसांनी शहरात नाकेबंदी करुन सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली आहे.
सीसीटीव्हीची तपासणी
या घटनेनंतर पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी केली आहे. तसेच डीआरएम कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पडताळणी केली जात आहे. पण, अद्याप कोणतेही धागेदोरे हाती लागले नाही.
फरीदकोटमध्ये 2 वेळा घडली घटना
फरीदकोट जिल्ह्यात यापूर्वी दोनवेळा अशा घटना घडल्या आहेत. यापूर्वी एका पार्कच्या भिंतीवर असे नारे लिहिण्यात आले होते. त्यानंतर सेशन जजच्या घराच्या भिंतीवरही खलिस्तान जिंदाबाद लिहिण्यात आले होते. पोलिसांनी ते पेंटच्या मदतीने मिटवून टाकले. पण, आरोपींच्या मुसक्या आवळण्यात त्यांना अद्याप यश आले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.