आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील खंडवा न्यायालयाने शनिवारी अल्पवयीन मुलीला बाळ झाल्याप्रकरणी तिच्या पतीला तब्बल 10 वर्षांची शिक्षा ठोठावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने केवळ नवजात मुलाच्या डीएनए रिपोर्टच्या आधारावर हा फैसला दिला. प्रकरण जुलै 2017 चे आहे. आरोपीने सदर अल्पवयीन मुलीशी पळवून नेऊन लग्न केले होते. जानेवारी 2019 मध्ये ते सापडले तेव्हा त्यांच्याकडे 6 महिन्यांचे बाळ होते.
प्रकरण जाणून घेण्यापूर्वी वाचा न्यायमूर्तींचे कमेंट्स...
न्यायमूर्ती प्राची पटेल यांच्या न्यायालयाने हा फैसला देताना अनेक महत्त्वपूर्ण निरिक्षणे नोंदवली. त्या म्हणाल्या - सद्यस्थितीत मुलांविरोधातील गुन्ह्यांत सातत्याने वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. या प्रकरणी आरोपी सुरेशने अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला आहे.
आर्थिक दंडासह 10 वर्षांची शिक्षा
विशेष न्यायमूर्ती (पॉक्सो कायदा) प्राची पटेल यांनी आरोपी सुरेश उर्फ सुरपाल पिता रूपसिंह (24) याला पॉक्सो कायद्यांतर्गत 2 हजार रुपयांच्या आर्थिक दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. फिर्यादी पक्षाच्यावतीने एडीपीओ रुपेश तमोळी यांनी युक्तिवाद केला.
आता वाचा... अल्पवयीन मुलीवरील गैरवर्तनाचे प्रकरण
24 जुलै 2017 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास एक वृद्ध महिला जेवण करून घराबाहेर शतपावली करत होती. तेव्हा तिची 16 वर्षीय नात घरामागे भांडी घासत होती. काही वेळानंतर या महिलेची नात बेपत्ता झाली होती. तिने शेजारी राहणाऱ्या आपल्या मुलाला याविषयी विचारणा केली. त्यानंतर आपल्या छोट्या मुलाच्या मदतीने गावाता सर्वत्र आपल्या नातीचा शोध घेतला. पण ती सापडली नाही. त्यानंतर गावातील सुरेश नामक तरुणही बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यानेच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा दावा करण्यात आला.
आजीच्या तक्रारीनुसार, छैगावमाखन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 2 वर्षांनंतर 16 जानेवारी 2019 रोजी पोलिसांनी या मुलीची सुरेशच्या तावडीतून सुटका केली. तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिला 6 महिन्यांचे बाळ असल्याचे स्पष्ट झाले. या बाळाचा डीएनए आरोपीच्या डीएनएशी जुळवून पाहण्यात आला. त्याचा रिपोर्ट सकारात्मक आला. न्यायालयाने फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारावर अल्पवयीन मुलीवर आरोपीने बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.