आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Khap Mahapanchayat Gives Energy To Farmers' Movement; Will Be Marching Towards Ghazipur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:खाप महापंचायतमुळे शेतकरी आंदोलनास मिळाली ऊर्जा; गाझीपूरकडे कूच करणार

बडौत / एम. रियाज हाश्मीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
गाझीपूर सीमेवरील गर्दीनंतर काटेरी कुंपण, १२ स्तरीय सुरक्षा - Divya Marathi
गाझीपूर सीमेवरील गर्दीनंतर काटेरी कुंपण, १२ स्तरीय सुरक्षा
  • पश्चिम यूपीत मुजफ्फरनगर, मेरठनंतर बडौतमध्ये महापंचायत

पश्चिम उत्तर प्रदेश व हरियाणात सातत्याने सर्वखाप पंचायतकडून शेतकरी आंदोलनाला नवीन ऊर्जा मिळू लागली आहे. दिल्लीच्या उंबरठ्यावरील गाझीपूर, सिंघू, टिकरी सीमेवर शेतकरी पोहोचू लागले आहेत. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यांतील बडौतमध्ये रविवारी सलग तिसऱ्यांदा सर्वखाप महापंचायत झाली. जिल्हा प्रशासनाने माफी मागितल्याने त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरे जाण्याची वेळ आली नाही. गाझीपूर सीमेवर कूच करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. प्रत्येक खाप पंचायतने प्रत्येक शेतकऱ्यास प्रती अडीच एकरी १०० रुपये आंदोलनात सहकार्य देण्याचा निर्णय सुनावला. सोमवारी बिजनौरमध्ये महापंचायत होणार आहे. महापंचायत सर्वखापची हाेती. त्यामुळे आज त्यात जयंत चौधरी, नरेश टिकैत सहभागी झाले नव्हते. सलग दोन दिवस येथे राजकीय रंग दिसला. रविवारी मात्र हा रंग दिसला नाही. परंतु भाकियू व रालोदचे स्थानिक नेते मात्र उपस्थित होते. देशखाप चौधरी सुरेंद्र सिंह म्हणाले, ही लढाई कृषी कायद्यांच्या विरोधात होती. परंतु आता मान-सन्मानासाठी आहे. पोलिसांची लाठी खाऊ शकतो. परंतु भाजप आमदार व त्यांच्या गुंडांची लाठी खाणार नाहीत.

आज बिजनौरमध्ये महापंचायत
मुजफ्फरनगर, मेरठ, बडौतनंतर सोमवारी बिजनौरमध्ये महापंचायत होणार आहे. बडौतच्या सर्वखाप पंचायतमध्ये देशखाप, धनकड खाप, राठी खाप, चौहान खाप, बालियान खाप, चौबीसी खाप, धामा खाप, मलिक खाप, पंवार खाप इत्यादीचे प्रमुख सहभागी होतील. प्रशासनाने धरणे आंदोलनस्थळाहून उचलेले सर्व सामान परत करण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...