आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​खर्गे ED च्या समन्सवर भडकले:म्हणाले -संसद अधिवेशन सुरू असताना मला बोलावले; कोणी चूक केली तर यंत्रणा कारवाई करेल -गोयल

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरूवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी ईडीवर संसद अधिवेशन सुरू असताना आपल्याला बोलावण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी चूक करणाऱ्यांवर यंत्रणा निश्चितच कारवाई करतील, असे स्पष्ट केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांत चांगलेच वाक्युद्ध रंगले.

सभागृहात खरगे VS पियूष

मल्लिकार्जुन खर्गे - ईडीने मला नॅश्नल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश दिलेत. ते मला संसदेचे अधिवेशन सुरू असताना कसे काय बोलावू शकतात? मला ईडीपुढे दुपारी 12.30 वा. हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मी कायद्याचे पालन करणारा व्यक्ती आहे. पण अधिवेशन सुरू असताना मला बोलावणे योग्य आहे?

मल्लिकार्जुन खर्गे.
मल्लिकार्जुन खर्गे.

काल पोलिसांनी सोनिया व राहुल गांधी यांच्या घरांना घेराव घातला होता. अशा वातावरणात लोकशाही जिवंत राहील काय? आम्हाला संविधानानुसार काम करता येईल काय? आम्ही याला घाबरणार नाही. याविरोधात लढणार.

पियूष गोयल -सरकार कोणत्याही एजंसीच्या कामात हस्तक्षेप करत नाही. कदाचित काँग्रेसच्या काळात असे होत असेल. पण आता एखाद्याने चूक केली तर यंत्रणा आपले काम चोखपणे करतील.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यंग इंडिया कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. ED ने त्यांना सर्च संपेपर्यंत त्यांचे हजर राहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

काँग्रेसने पावसाळी अधिवेशनाच्या 14 व्या दिवशीही सरकार विरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांत तीव्र गदारोळ केला. यामुळे लोकसभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करावे लागले. दुसरीकडे, राज्यसभेतही विरोधकांचा गदारोळ झाला.

दोन्ही सभागृहांतील काँग्रेस नेत्यांनी सरकारवर तपास यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला आहे. प्रकरण नॅश्नल हेराल्ड प्रकरणातील ईडीच्या कारवाईशी संबंधित आहे. विशेष म्हणजे बुधवारीच ईडीने नॅश्नल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियाचे दिल्ली स्थित कार्यालय सील केले होते.

वाहतूक मंत्र्यांची कारच्या सुरक्षा मापदंडांवर चर्चा

लोकसभेचे कामकाज स्थगित होण्यापूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सरकार कारच्या मागच्या सीटवरही एअरबॅग्ज लावण्याच्या प्रयत्नांत असल्याचे स्पष्ट केले. सरकार कारच्या मागच्या सीटवर एअरबॅग्ज लावण्याच्या प्रयत्नांत आहे. यामुळे अधिकाधिक प्रवाशांचा जीव वाचवणे सोपे होईल. यासंबंधीच्या एका प्रस्तावावर विचार सुरू असून, लवकरच याविषयी निर्णय घेतला जाईल, असे गडकरी म्हणाले. सद्यस्थितीत केवळ पुढील सीटसाठीच एअरबॅग्ज उपलब्ध आहेत.

संसदेत बोलताना नितीन गडकरी.
संसदेत बोलताना नितीन गडकरी.
बातम्या आणखी आहेत...