आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकची टेबल टेनिसपटू तनीषा कोटेचा हिने खेलो इंडिया स्पर्धेत गुरुवारी एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिला दुहेरी मुकुटाची संधी आहे. तिने उपांत्य सामन्यात हरियाणाच्या प्रिथाेकीचा ४-० फरकाने पराभव केला. महाराष्ट्राने तिसऱ्या दिवसअखेर सर्वाधिक २१ पदके जिंकली आहेत. यात ८ सुवर्ण, ६ राैप्य व ७ कांस्यचा समावेश आहे. तनीषाने दुहेरी गटात रौप्यपदक जिंकले आहे.
याेगासनांत एकाच दिवशी डझनभर पदके : महाराष्ट्राने याेगासनांत एकाच दिवशी १२ पदके जिंकली आहेत. यात प्रत्येकी ४ सुवर्ण, राैप्य आणि कांस्यपदकांचा समावेश आहे.
ईशाला राैप्यपदक : महिलांच्या दहा मीटर रायफल प्रकारात ईशाने राैप्यपदकावर आपले नाव कोरले. तिने पदार्पणातच पदकाचा बहुमान पटकावला आहे.
स्वप्निलला कांस्य : पुरुषांच्या २५ मीटर पिस्तूल रॅपिड फायर प्रकारात स्वराज भाेंडवेने कांस्यपदक पटकावले. यासह ताे पहिल्याच प्रयत्नात पदक विजेता ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.