आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Khir Bhavani Jatra: Srinagar Pandit Will Not Go, Jammu Will Participate, Mata Khir Bhavani Venue Trust Said, Cancel The Jatra

ग्राउंड रिपोर्ट:खीरभवानी जत्रा : श्रीनगरचे पंडित नाही जाणार, जम्मूचे सहभागी होणार; ट्रस्ट म्हणाले, जत्रा रद्द करा

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी आश्वासने आणि काश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी वेगाने स्थलांतरीत केल्यानंतरही काश्मिरी पंडितांचा विरोध कायम आहे. ते ड्युटीवरून परतण्यास सातत्याने नकार देत आहेत. आपले स्थलांतर काश्मिरच्या बाहेर कुठेही करा, अशी त्यांची इच्छा आहे. यामुळे कर्मचारी आणि सरकारमध्ये गतिरोध निर्माण झाला आहे. सरकारचे म्हणणे आहे की, कर्मचाऱ्यांना काश्मिरच्या बाहेर पाठवले तर हे संपूर्ण पीएम पुनर्वसन पॅकेज अपयशी ठरेल. तसेच काश्मिरी पंडित परत येण्याची शक्यता कमी राहील. दुसरीकडे प्रकाशझोतात राहण्यासाठी आम्हाला बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी सरकारवर लावला आहे. अशा स्थितीत दरवर्षी होणाऱ्या खीर भवानी जत्रेचा उत्साह कमी होत आहे. ८ जून रोजी तुलामुल्ला गांदरबलमध्ये सुरू होणाऱ्या खीर भवानी जत्रेवर बहिष्कार टाकण्याची विनंती काश्मिरी पंडित संघटनांनी केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मंदिरांमध्ये खीर भवानी सर्वात पवित्र आहे.

पंडितांचे आंदोलन आणि जम्मूतील पलायनामुळे जत्रेवर परिणाम होऊ शकतो. गेल्या आठवड्यात जम्मूला गेलेल्या एका पंडित कर्मचाऱ्याने सांगितले की, मी खीर भवानी जत्रेत दहा पाहुण्यांची अपेक्षा करत होतो. ते या जत्रेदरम्यान माझ्याकडे थांबले असते आणि काही दिवसांनी निघून गेले असते. मात्र, या स्थितीनंतर मी काश्मिर सोडले असून तुम्ही आपला दौरा रद्द करा, असे मी त्यांना म्हणालो. तथापि, जम्मूतून जत्रेसाठी येणाऱ्या काश्मिरी पंडितांमध्ये उत्साह आहे. रविवारपर्यंत १५०० पेक्षा जास्त जम्मूत राहणाऱ्या पंडितांनी जत्रेला येण्यासाठी नोंदणी केली आहे. काश्मिरी पंडितांना जम्मूतून बसेसद्वारे कडक सुरक्षेत तुल्लामुल्ला येथे आणले जाईल. दुसरीकडे प्रशासनाचे म्हणणे आहे की, उत्सव साजरा करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. राहणे, बेड, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, बॅरिकेडिंग, संयुक्त नियंत्रण कक्षाची स्थापना, आरोग्य सुविधा, वाहनांची पार्किंग, संपूर्ण सुरक्षा आणि आवश्यक वस्तुंच्या उपलब्धतेसह सर्व सुविधा असतील. गांदरबल उपायुक्त श्यामबीर यांनी काश्मिरी पंडितांना या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पोलिस अधीक्षक निखिल बोरकर म्हणाले, खीर भवानी जत्रेसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे.

यंदा १५००० भक्त येणार असल्याची अपेक्षा
खीर भवानी प्रसिद्ध हिंदू मंदिर असून ते श्रीनगरपासून २७ किमी दूर तुल्ला मुल्ला गावात आहे. मंदिराचे बांधकाम एका पवित्र धबधब्याच्या वर केले आहे. याबाबत म्हटले जाते की, तो आपला रंग बदलतो. यामुळे येणारा काळ चांगला राहील किंवा खराब, हे कळते. खीर भवानी देवी दुर्गेचा एक अवतार आहे. हे मंदिर महाराजा प्रताप सिंहांनी १९१२ मध्ये बनवले होते. या जत्रेत यंदा १५ हजार भक्त येऊ शकतात. २०१९ मध्ये ५५ हजार लोक आले होते.

सचिवालय, संचालनालयात उपस्थिती सामान्य
समाजकल्याण विभाग, रस्ते विकास, ग्रामीण विकास आदी विभागांत काश्मिरी पंडित काम करत नाहीत. तथापि, विभाग कार्यभार सांभाळत आहेत. कारण अशा विभागांत काश्मिरी पंडितांची संख्या कमी आहे. जे काश्मिरी पंडित आणि हिंदू कार्यकर्ते सचिवालय, साचालनालयात काम करत आहेत ते नियमितपणे येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...