आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरत:गुजरातची खुशी चिंदलिया झाली भारतात यूएनईपीची हरित राजदूत, निसर्गावरील प्रेमामुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना

सुरत7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील खुशी चिंदलिया, वय वर्षे १७. संयुक्त राष्ट्रात भारतासाठी यूएनईपीची राजदूत नियुक्त करण्यात आली आहे. पर्यावरणावरील प्रेमामुळे खुशीने अत्यंत कमी वयात हे यश संपादन केले आहे. संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम तंुजा इको जनरेशनची (यूएनइपी) हरित राजदूत म्हणून निवड झाल्यानंतर तिने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, माझ्या गावात चाेहाेबाजूला असलेली झाडे वाळत चाललेली पाहून निसर्ग वाचविण्यासाठी उपाययाेजना शाेधत हाेते.

मी आणि माझे आप्त नव्या घरात राहण्यास गेलो तेव्हा तेथे चोहोबाजूला खूप झाडे होती. माझ्या घराजवळ असलेल्या चिकूच्या झाडांना पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा दिली. आम्ही निसर्गाच्या सान्निध्यातच राहत होतो. परंतु मी जसजशी मोठी होत गेले तेव्हा काही झाडांच्या वाढण्याने जंगल माजले. माझ्या बालपणाइतका निसर्गाचा मुक्त आनंद माझी लहान बहीण घेऊ शकणार नाही. त्याच क्षणी मी निसर्ग संरक्षणासाठी जागृत झाले. मी आजूबाजूच्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी उपाय शोधू लागले.

भारतासाठी हरित राजदूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर खुशीला पर्यावरण संरक्षणाबाबत जागृती निर्माण करण्याची व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारताने दिलेल्या योगदानावर चर्चा करण्याची संधी तिला मिळणार आहे. खुशीला जगभरातील अन्य राजदूतांसाेबत या विषयावर चर्चा करण्याचीही संधी मिळेल. ती स्वत: संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम - तुंजा इकाे जनरेशनवर भाषण देऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...