आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:इंडिया ओपन बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये किदांबी श्रीकांतसह 7 खेळाडू संक्रमित, त्यांनी स्पर्धेतून नावे घेतली मागे

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेवर कोरोनाने कहर केला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने सांगितले की, 7 भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये या खेळाडूंची नावे किदांबी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, रितिका राहुल ठकार, ट्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमन सिंह आणि खुशी गुप्ता सांगितली जात आहेत. मात्र, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने पॉझिटिव्ह खेळाडूंची नावे दिलेली नाहीत. .

12 जानेवारीला खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी झाली. आता या सर्व खेळाडूंसोबत ज्या खेळाडूचा सामना होता. त्यांना पुढील फेरीत वॉकओव्हर देण्यात आला आहे. स्पर्धेची दुसरी फेरी गुरुवारी खेळवली जाणार आहे.

खेळाडूंना आधीच झाला आहे संसर्ग
11 जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताचे दोन खेळाडू बी. साई प्रणीत आणि ध्रुव रावत यांना कोरोनाची लागण झाली होती.

इंग्लंड संघानेही कोरोनामुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. इंडिया ओपन टूर्नामेंट ही BWF वर्ल्ड टूर सुपर 500 चा भाग आहे. 16 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारतासह जगातील अनेक स्टार शटलर्स सहभागी होत आहेत.

सायना नेहवाल, लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सायना चेक गणराज्यची टेरेजा स्वाबिकोवा रिटायर झाल्यामुळे दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे.

सिंधू देखील दुसऱ्या फेरीत पोहोचली
स्टार खेळाडू पीव्ही सिंधूनेही आपला सामना जिंकला असून तिने इंडिया ओपन बॅडमिंटनची दुसरी फेरीही गाठली आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने देशबांधव श्रीकृष्ण प्रियाचा 21-5, 21- 16असा सरळ सेटमध्ये पराभव केला. प्रथम मानांकित सिंधूचा सामना 27 मिनिटे चालला.

बातम्या आणखी आहेत...