आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Killings Increase In Kashmir, Yet Record Tourist; Tourists Said There Was No Danger |marathi News

इथे पर्यटन दहशतमुक्त:काश्मीरमध्ये हत्या वाढल्या, तरीही विक्रमी पर्यटक; पर्यटक म्हणाले, इथे कोणताच धोका वाटत नाही

श्रीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘काश्मिरात खूप दहशत आहे, रोज खून होतात, हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. मात्र, इथे आल्यानंतर चित्र वेगळे होते. इथे आम्हाला अधिक सुरक्षित असल्याचे जाणवले. लोक खूप सरळ व प्रामाणिक आहेत. फक्त टीव्ही पाहणे बंद केल्यास सर्वकाही शांत वाटेल.’ लखनऊहून काश्मिरला आलेल्या मोनासह इथे आलेल्या अनेक पर्यटकांनी भास्करशी केलेल्या चर्चेत हेच सांगितले. आकडेही याची साक्ष देतात.

यावर्षी मेमध्ये विक्रमी ३.७५ लाख पर्यटक काश्मीरला आले. जूनच्या पहिल्या आठवड्यात यावर्षी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा आकडा १० लाखांवर गेला आहे. हे पहिल्या ५ महिन्यांत एका दशकात पर्यटकांचे सर्वाधिक आगमन आहे. या चित्राची दुसरी बाजू म्हणजे या वर्षी मेमध्ये अतिरेक्यांनी ७ नागरिकांची टार्गेट किलिंग केली आहे. ती २०१८ नंतर मेमध्ये सर्वाधिक आहे. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ काश्मिरचे (टाक) अध्यक्ष फारूक कुथू सांगतात- हत्या होण्यापूर्वीही येथील सर्व ६०,००० खोल्या बुक होत्या व आजही ही स्थिती कायम आहे. मेमध्ये झालेल्या हत्या शोपियां, बडगाम आणि बारामुल्ला जिल्ह्यांतील आहेत. तर पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांमध्ये श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, सोनामार्ग आदी ठिकाणांचा समावेश आहे.

तज्ज्ञ; पर्यटनावर हिंसाचाराचा परिणाम नाही, कारण तो रोजगाराशी संबंधित
जाणकार सांगतात- एखाद्या पर्यटकाला नुकसान पोहोचवल्यास काश्मिरचे लोक निंदा करतील आणि समाजातील मोठ्या वर्गाचे समर्थन हातचे जाईल, हे अतिरेकी जाणतात. लाखो लोकांचा रोजगार पर्यटनावर आहे. पर्यटक इथे काही दिवसांसाठी येतात. त्यामुळे अतिरेक्यांकडे त्यांना नुकसान पोहोचवण्याचे कोणतेच औचित्य राहिले नाही.

बातम्या आणखी आहेत...