आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातपाय बांधून किन्नरला बेदम मारहाण, VIDEO:एरियावरुन गुंडगिरी, रिव्हॉल्व्हरही काढली, सोडण्याची गयावया करून ऐकलं नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणामध्ये 2 किन्नरांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे. ही घटना हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौलमध्ये घडली आहे. डेरा संचालकाने (किन्नर) आपल्या गुंडांच्या मदतीने किन्नरचे हात-पाय लाठीने बांधले आणि बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर रिव्हॉल्व्हर काढून जीवे मारण्याची धमकीही दिली.

काठ्यांनी बेदम मारहाण
व्हिडिओमध्ये दिसते की, हल्लेखोरांनी किन्नरचे हात-पाय बांधले. यादरम्यान, किन्नरने आपले हात तुटल्याचे सांगून सोडण्याची विनंती करत केली. परंतु हल्लेखोराने काठीने बेदम मारहाण केली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखी एका किन्नराल काठीने मारहाण केल्याचे दिसून आले.

सोडण्याची विनवणी
किन्नरने हल्लेखोरांना सोडण्यासाठी गयावया केली. पण त्यांनी जराही दया दाखवली नाही. अंबाला शहरातील किन्नर लतिका रंधावा हिने सांगितले की, तिच्या समाजात किन्नरवर असे अत्याचार होतात. कोणीही आवाज उठवत नाही. पोलिस प्रशासनही काही करत नाही.

पोलिसांकडे न्याय मागितला
रंधावा यांनी सांगितले की, हा व्हिडिओ नारनौल बाजूचा आहे. एरियासाठी किन्नरांना निर्दयीपणे मारहाण केली जात आहे. त्यांनी अंबाला पोलिस अधीक्षकांमार्फत महेंद्रगडच्या पोलिस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी केली आहे.

म्हणायचे-तू हिजडा आहेस

मी किन्नर संजना सिंह, भोपाळची रहिवासी आहे. मी सुशिक्षित आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे. पण यानंतरही माझ्यावरील हिजडा असल्याचा कलंक कधीच धुतला गेला नाही. माझे बालपण इतर किन्नर असलेल्या मुलासारखेच होते. वडिल पोलिसात होते, आई गृहिणी होती. पाच भावंडांमध्ये मी तिसरी होते. मी जन्मजात किन्नर असल्याचे माझ्या पालकांनी किन्नर समाजापासून लपवून ठेवले होते. त्यांनी मला मुलगा म्हणून ओळख दिली. मी आता माझी पुढची कहाणी सांगते ती त्याच ओळखीने म्हणजे एक मुलगा म्हणून... संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बीडचा हलगी वाजवणारा तरुण किन्नर सपनाशी होणार विवाहबद्ध

जागरण गोंधळात हलगी वाजवून उरनिर्वाह करणारा बीडचा बाळू धुताडमल याची किन्नर असलेल्या सपनाशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अडीच वर्षांपासून ते ‘लिव्ह इन इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. या दोघांनी आता पुढील आयुष्यात एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. ६ मार्च रोजी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ते विवाहबद्ध होणार आहेत. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...