आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचा बनाव करून जम्मू-काश्मीरमध्ये झेड प्लस सुरक्षा घेणारा महाठक किरण पटेलला पाेलिसांनी अहमदाबादला आणले. त्याच्यावर माजी मंत्र्याचा १५ काेटी रुपयांचा बंगला हडपल्याचा आराेप आहे. न्यायालयाने त्यास सात दिवसांच्या कोठडीत पाठवले. पाॅलिटेक्निकमधून संगणक अभियंता पदविका, त्रिची आयआयएममधून एमबीए केल्याचा दावा त्याने केला. त्याची शैक्षणिक पात्रता तपासण्यात येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.