आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाठक:किरण पटेलची अनेक कारस्थाने उघडकीस, काश्मिरातील मोठ्या अधिकाऱ्यांना कोट्यवधींना गंडवले

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:ला पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगून जम्मू-काश्मिरात झेड प्लस संरक्षण मिळवणारा किरण पटेल गुजरात पोलिसांच्या कोठडीत आहे. तथापि, जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या कारनाम्यांची मोठी यादीच तयार झाली आहे. असे म्हटले जाते की, किरणबाबत जी माहिती समोर आली आहे ती वरवरची आहे. खरी कथा तर वेगळीच आहे. खात्रीलायक सूत्रांनुसार, किरणने जम्मू दौऱ्यात अनेक आयएएस अाणि जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवेतील अनेक अधिकाऱ्यांना गंडवले आहे. काही अधिकाऱ्यांना चांगल्या ठिकाणी बदली देण्याचे आश्वासन दिले तर काहींना कमिशनच्या बदल्यात मोठी रक्कम देण्याचा आश्वासन दिले होते. काहींना त्याने मोठे प्रकल्प मिळवून देण्यासाठी आणि दिल्लीतील सत्ताधाऱ्यांपर्यंत चांगली पोहोच असल्याचे सांगून ठगवले. किरणने या अधिकाऱ्यांंकडून कोट्यवधी रुपये उकळले आहेत. आता हे अधिकारी आपण प्रकाशात आल्यास अटक होईल म्हणून घाबरत आहेत. अशाच एका प्रकरणात एका अधिकाऱ्याने उच्च पदासाठी एक कोटी रुपये दिले होते. वास्तविक किरण चतुर होता. त्याने केवळ उच्चभ्रू लोकांची फसवणूक केली. तो त्यांची कमजोरी जाणत होता आणि आपण अडकणार नाही, असा विचार करत होता. किरण ऑक्टोबर २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान काश्मिरात ४ वेळ आला. एका दौऱ्यात त्याने पुलवामातील डी.सी. बशीर चौधरी यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याचे आश्वासन दिले. योगायोगाने डी.सी. बशीर चौधरींना क्षयरोग निर्मूलनासाठी वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. या पुरस्कारात किरणची भूमिका आहे की नाही, हे काेणालाच माहीत नाही. भास्करने पुलवामाचे डी.सी.बशीर आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक जुल्फिकार यांची बाजू जाणून घेतली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सूत्रांच्या मते तो इतका बेधडकपणे एलआेसीवर गेला आणि अधिकाऱ्यांशी बोलला, यावरून त्याच्या मागे एखाद्या माेठ्या व्यक्तीचा हात होता, हे उघड आहे. ऑक्टोबरमध्ये पहिल्या दौऱ्यात किरणला संरक्षण दिले गेले होते. बशीर यांनी वरिष्ठ पोलिस अधीक्षक जुल्फिकार यांना फोन केला. त्यांनीच त्याला बुलेटप्रूफ वाहन, एस्कॉर्ट वाहन आणि डझनावर संरक्षक कर्मचाऱ्यांची सुरक्षा दिली. या प्रकरणात दोघांचीही चौकशी करण्यात आली. किरणला २ मार्च रोजी अटक करण्यात आली. परंतु पोलिसांनी १६ मार्चपर्यंत ही बाब लपवून ठेवली. एक मोठा मासा हाती लागल्याचे पोलिसांना वाटत होते. त्यामुळे काय करावे आणि काय नाही, याचेच गणित पोलिस करत होते. त्याला सोडून देण्यासाठी वरून दबाव आणला गेला, अशी शंकाही व्यक्त होत आहे. परंतु पोलिसांनी बचाव करत त्याला कोर्टासमोर हजर केले. कारण पोलीस महिनोंमहिने अटक करत राहतात आणि काहीच सांगत नाहीत. यामध्ये पोलिसांना न्यायालयात जाण्याचा सल्ला कोणी व का दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किरणचा पर्दाफाश करण्यात अमित पंड्या आणि जय सीतापाराची भूमिका असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही.

{तपासाचा परिणाम नाही : २९ मार्च रोजी, जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांना किरणच्या काश्मीर भेटींची चौकशी करण्याचे आदेश दिले. सात दिवसांत अहवाल देण्यास सांगितले. मात्र हे काम अजूनही झालेले नाही.तसेच एडीजीपींनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. मात्र अजून कुणावरही कारवाई झालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या अधिकाऱ्याला अटक झाल्यास तो सर्व काही उगळून मोकळा होईल, अशी भीती आहे. त्यामुळे वाट पाहणे आणि प्रकरण थंडबस्त्यात जाईपर्यंत प्रतीक्षा करणे, हाच मार्ग आहे.

{एकच व्यक्ती समोर आली. : किरण पटेल याने सामान्य व्यक्तीला ठगवले असते तर ते समोर आले असते. आतापर्यंत माध्यमांसमोर केवळ एकच व्यक्ती आली आहे. किरणने आपल्याला ठगवले असल्याचा दावा त्याने केला आहे. २६ वर्षीय दानीश हसन यांनी आरोप केला की, ते श्रीनगरमध्ये शैलेश जैन आणि पीयूष जैन यांच्या संपर्कात आलो होतो. दोघांनी किरणशी चेतन प्रकाश असे सांगून भेट घालून दिली होती. या लोकांनी त्यांना ड्रायफूटचा व्यवसाय करणाऱ्या मीरा कंपनीत १८ लाख रुपये गुतवण्यास तयार केले होते. नंतर पैसे घेऊन तो फरार झाला. कोणाला काहीही सांगू नको, असेही धमकावले. किरणला अटक झाल्यानंतर दानीश पोलिसांत पोहोचले.