आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात रिजिजू बालंबाल बचावले. दरम्यान, कारचे मात्र नुकसान झाले आहे. गाडीची लेन बदलण्याच्या चुकीमुळे हा अपघात झाला. रिजिजू जम्मूहून श्रीनगरला जात होते. ज्या ट्रकला धडक दिली तो मालाने भरलेला होता. रामबन जिल्ह्यात हा अपघात झाला. येथे महामार्गांचे बांधकाम सुरू आहे.
ट्रकने कारला एका बाजूने दिली धडक
आदल्या दिवशी केंद्रीय मंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमधील उधमपूर भेटीचे व्हिडिओ ट्विट केले होते. त्यात त्यांनी उधमपूर येथे एका विधी सेवा शिबिरात सहभागी होणार असल्याचे सांगितले.
डोगरी भाषेत राज्यघटनेच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन
रिजिजू शनिवारी जम्मू विद्यापीठात डोगरी भाषेतील भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाला उपस्थित होते. यावेळी रिजिजू म्हणाले की, न्यायालयात सुमारे 5 कोटी खटले प्रलंबित आहेत. ते म्हणाले की, प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी तंत्रज्ञान केवळ महत्त्वाची भूमिका बजावू शकत नाही, तर लोकांपर्यंत न्याय देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
रिजिजू म्हणाले की, ई-कोर्ट प्रकल्पाचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ती वेळ दूर नाही जेव्हा देशातील सर्व न्यायालये पूर्णपणे पेपरलेस होतील. न्याय वितरणाची प्रक्रिया सुलभ आणि परवडणारी बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व नागरिकांना समजण्यासाठी मूलभूत शब्दसंग्रह तयार करण्यासाठी सरकार सुमारे 65,000 कायदेशीर पारिभाषिक शब्दांचे डिजिटायझेशन करत आहे.
हे ही वाचा
जज न्यायदान सोडून राजकारण करत आहेत:कायदा मंत्री म्हणाले - देशाच्या न्यायपालिकेत मतभेद-गटबाजी
'न्यायपालिकेचे कामकाज पारदर्शक नाही. तिथे खूप राजकारण होते. हे राजकारण बाहेरून दिसत नाही. पण तिथे खूप मतभेद आहेत. अनेकदा गटबाजीही दिसते. न्यायाधीश न्यायदान सोडून कार्यकारींचे काम केले तर आपल्याला या संपूर्ण व्यवस्थेचा पुनर्मूल्यांकन करावे लागेल,' अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी न्यायव्यवस्थेचे वाभाडे काढलेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.