आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेक न्यूज तसेच दिशाभूल करणाऱ्या बातम्या ठरवण्याच्या नियमांत सुधारणा केली जाईल असे कायदा मंत्री किरण रिजीजू रविवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले. नियम लागू करण्यापूर्वी यावर चर्चा केली जाईल. निवडणूक प्रक्रियेतील सुधारणेवरही विचार केला जात आहे म्हणूनच फेक न्यूजवर लगाम लावण्याची गरज असल्याचे रिजीजू म्हणाले.
सरकार बनवणार फॅक्ट चेक युनिट
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुरूवारी अधिसूचना जारी केली होती. यात सांगितले होते की माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मीडिया 2023 च्या नियमांत बदल होतील. यानुसार फॅक्ट चेक युनिट बनवले जाईल, जे केंद्र सरकारशी संबंधित फेक, खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांची पडताळणी करेल. यामुळे ऑनलाईन फेक न्यूज पसरवणाऱ्यांची दुकाने बंद होतील.
जम्मू-काश्मिरात विधानसभा निवडणूक कधी होईल?
जम्मू-काश्मिरात विधानसभा निवडणुकीविषयी प्रश्न विचारल्यावर कायदा मंत्री म्हणाले की मी निवडणुकीच्या वेळेची घोषणा करू शकत नाही. मी कायदा आणि निवडणूक आयोगाचा प्रशासकीय मंत्री आहे, म्हणून याचे उत्तर इथे देणे योग्य नाही. वेळ आल्यावर घोषणा केली जाईल. पीडीपी प्रमुख महबूबा मुफ्तींच्या कन्या इल्तिजा मुफ्तींच्या पासपोर्टविषयीच्या आरोपांवर रिजीजू म्हणाले की पासपोर्ट गृह मंत्रालय जारी करते.
350 वकील म्हणाले- कायदा मंत्र्यांना धमकी देणे शोभत नाहीः रिजीजू म्हणाले - काही निवृत्त न्यायाधीश अँटी इंडिया ग्रुपचा भाग झाले
सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टाच्या 350 हून अधिक वकिलांनी किरण रिजीजूंच्या वादग्रस्त विधानाची निंदा केली आहे. रिजीजूंनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये निवृत्त न्यायाधीशांविषयी एक विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की काही निवृत्त न्यायमूर्ती अँटी इंडिया ग्रुपचा भाग झाले आहेत.
रिजीजूंच्या या विधानावर वकिलांच्या ग्रुपने एक स्टेटमेंट जारी केले आहे. त्यांनी म्हटले की, कायदा मंत्र्यांना धमकी देणे शोभत नाही. सरकारची टीका ही देशाविरोधात नसते आणि देशद्रोहीही नसते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.