आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kiren Rijiju Vs Rahul Gandhi; Pappu | Congress Cambridge Speech And Pm Narendra Modi | Kiren Rijiju

राहुल गांधी म्हणजे 'पप्पू':कायदा मंत्री किरण रिजिजू म्हणाले - ते देशाच्या ऐक्यासाठी धोकादायक; केंब्रिजमधील भाषणावर केली टीका

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पप्पू म्हणून हेटाळणी केली आहे. ते राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणाचा व्हिडिओ ट्विट करताना म्हणाले - काँग्रेसच्या स्वयंघोषित राजकुमाराने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा व्यक्ती भारताच्या ऐक्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. आता तो लोकांना भारतात फूट पाडण्यासाठी चिथावत आहे. याऊलट भारताच्या लोकप्रिय व आवडत्या पंतप्रधानांचा एकच मंत्र आहे, तो म्हणाले ‘एक भारत, श्रेष्ठ भारत.’

किरण रिजिजू यांनी एका ट्विटद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला.
किरण रिजिजू यांनी एका ट्विटद्वारे राहुल गांधींवर निशाणा साधला.

परदेशींना माहिती नाही राहुल पप्पू आहे -रिजिजू

रिजिजू अन्य एका ट्विटमध्ये म्हणाले - भारतातील लोकांना राहुल गांधी पप्पू आहेत हे माहित आहे. पण परदेशी लोकांना ते माहिती नाही. त्यांच्या मूर्ख विधानांवर प्रतिक्रिया देण्याची काहीच गरज नाही. पण देशद्रोही शक्ती त्यांच्या देशद्रोही विधानांचा वापर भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी करत आहेत.

किरेन रिजिजू म्हणाले की, सेम प्रोडक्ट री-लॉन्च करण्यावर काहीतरी मर्यादा असावी. लंडनमध्ये पुन्हा एकदा लॉन्च केल्यानंतर हीच गँग भारतात सातत्याने मार्केटिंग करत आहे.
किरेन रिजिजू म्हणाले की, सेम प्रोडक्ट री-लॉन्च करण्यावर काहीतरी मर्यादा असावी. लंडनमध्ये पुन्हा एकदा लॉन्च केल्यानंतर हीच गँग भारतात सातत्याने मार्केटिंग करत आहे.

राहुल गांधींच्या केंब्रिजमधील या विधानांवर झाला होता वाद

1. भारतात मीडिया व लोकशाही संरचनेवर हल्ला

"विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. माझ्याविरोधातही अनेक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील अनेक गुन्हे चुकीच्या कारणांसाठी दाखल करण्यात आलेत. देशातील मीडिया व लोकशाही व्यवस्थेवर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर विरोधक म्हणून तुमच्यासाठी बोलणे अवघड होते. "

2. माझा फोन रेकॉर्ड केला जात होता

"माझ्या फोनची हेरगिरी केली जाते. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून असा दबाव मला नेहमीच सहन करावा लागतो. बहुतांश राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस आहे. माझ्या फोनमध्येही पेगासस होते. मला गुप्तहेर अधिकाऱ्यांनी बोलावून सांगितले होते की, तुम्ही फोनवर बोलताना सावधगिरी बाळगा. कारण आम्ही ते रेकॉर्ड करत आहोत. हा एक असा दबाव आहे, जो आम्हाला नेहमीच जाणवतो. "

3. विरोधक मुद्यांवर बोलत असताना, तुरुंगात डांबले

"लोकशाहीसाठी आवश्यक असलेली संसद, स्वतंत्र प्रेस, न्यायपालिका या सर्वच संरचना विवश झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही भारतीय लोकशाहीच्या मूळ संरचनेवरील हल्ल्याचा सामना करत आहोत. भारतीय संविधानात भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा गरजेची आहे. आता ही बातचितच संकटात सापडली आहे. हे छायाचित्र संसदेसमोरील आहे. विरोधी पक्षांचे नेते काही मुद्यांवर चर्चा करत होते. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. असे 3 ते 4 वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते."

4. अतिरेकी मला भेटले, पण त्यांनी मला काहीच केले नाही

राहुल गांधी म्हणाले, "भारत जोडो यात्रेत एक अज्ञात व्यक्ती माझ्याजवळ आला. त्याने माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने मला प्रश्न केला की, तुम्ही खरेच जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आला आहात का? तो आसपासच्या काही लोकांकडे इशारा करत म्हणाला की ते सर्व अतिरेकी आहेत. काही क्षणांसाठी मला मी संकटात सापडल्याचे वाटले. हे अतिरेकी मला ठार मारतील असा विचारही आला. पण त्यांनी काहीच केले नाही. हीच ऐकण्याची शक्ती आहे."

अनुराग म्हणाले - पेगासस राहुल यांच्या डोक्यात

अनुराग ठाकूर पेगासस मुद्यावर म्हणाले - 'हे कुठेही नाही तर राहुल यांच्या डोक्यात आहे. त्यांनी कोणत्या भीतीने आपला फोन जमा केला नाही. त्या फोनमध्ये असे काय होते. सततचे पराभव त्यांना पचत नाहीयत. राहुल परदेशात जाणून आपल्या परदेशी मित्रांच्या मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस काँग्रेसचा अजेंडा काय आहे?'

लर्निंग टू लिसन म्हणजे ऐकण्याच्या कलेवर बोलले राहुल

राहुल यांच्या 7 दिवसीय ब्रिटन दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आम्ही लोकशाही मूल्यांचा अभाव असणारे जग तयार होताना पाहू शकत नाही. त्यामुळे आम्हाला याविषयी नव्याने विचार करण्याची गरज आहे. ऐकण्याची कला खूप पॉवरफूल असते. येथे वाचा संपूर्ण बातमी...

बातम्या आणखी आहेत...