आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिरीट सोमय्या मुंबईतील अनेक बिल्डरांकडून खंडणी वसूल करतात. त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरच त्यांची चौकशी सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेमध्ये ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा उद्योग चालतो. अनेक व्यवसायिकांनी या संस्थेला संशयास्पद देणग्या दिल्या आहेत, असा आरोप करत ईडीनेही या व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
मोतीलाल ओसवाल कंपनीकडून सोमय्यांनी लाखो रुपये लाटले
संजय राऊत हे सातत्याने किरीट सोमय्यांवर आरोप करत आहे. आजदेखील मोतीलाल ओसवाल कंपनीकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानने लाखो रुपये लाटले, असा आरोप संजय राऊत यांनी केला. NSELच्या 5600 कोटी शेअर्स घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. मोतीलाल ओसवाल कंपनीची या प्रकरणी ED ने चौकशीही केली. मात्र, स्वतः किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनीच्या शिपायांच्या घरी गेले. तमाशा केला व नंतर 2018-19 असे 2 वर्ष सोमय्यांनी मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
किरीट सोमय्या अशाच पद्धतीने बिल्डर, व्यवसायिकांकडून खंडणी वसूल करतात. खंडणीचे सर्व पैसे त्यांच्या युवक प्रतिष्ठानमध्ये दिले जातात. अशा पद्धतीने काळा पैसा पांढरा करण्याचा उद्योग या संस्थेत चालतो. धर्मादाय आयुक्तांकडे या संस्थेची नोंदणी आहे. त्यामुळे आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे याबाबत तक्रार करणार आहोत व लवकरच चौकशीला सुरूवात होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
भाजपच्या 28 नेत्यांचे घोटाळे समोर आणणार
धमकी देऊन व्यवसायिकांकडून खंडणी वसूल करणाऱ्या किरीट सोमय्यांचा खरा चेहरा आपण समोर आणणार आहोत. आतापर्यंत केवळ दोन कंपन्यांच्या देणग्याबाबत आपण खुलासा केला आहे. अशा 150 कंपन्यांबाबत आपल्याला माहिती आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, भाजपच्या 28 नेत्यांचेदेखील घोटाळे समोर आणणार असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.