आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News News Today 12 February

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनाचा 79 वा दिवस:शेतकरी नेते टिकैत म्हणाले - 'देशभरात मोर्चा काढू, गुजरातला केंद्रिय नियंत्रणातून मुक्त करू'

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींच्या हम दो हमारे दो या वक्तव्याशी सहमत

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आज 79 दिवस झाले आहेत, पण तोडगा निघण्याऐवजी आंदोलन लांबत असल्याचे दिसत आहे. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी कृषी कायदे मागे घेण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला.

हरियाणाच्या बहादूरगड येथे आयोजित किसान महापंचायतीत टिकैत म्हणाले, 'आम्ही देशभरातून मोर्चा काढू. गुजरातमध्ये जाऊन त्यांना स्वतंत्र करु. ते केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे. भारत स्वतंत्र आहे, पण गुजरातमधील लोक बंदिवान आहेत. जर त्यांना या आंदोलनात सामील व्हायचे असेल, तर तुरुंगात जावे लागते'.

'सरकारसोबत चर्चेसाठी नेहमी तयार'
यापूर्वी टीकैत म्हणाले की, आता कृषी कायदे रद्द झाल्यावरच घरी परत जाऊ. आमचा मंच आणि पंच बदलणार नाही. सिंघू सीमेवर आमचे ऑफिस तसेच राहिल. जर सरकार आज चर्चा करत असेल तरीही आम्ही तयार आहे, जर 10 दिवसांनंतर किंवा पुढच्यावर्षी बोलणार असेल तरीही आम्ही तयार आहोत. आम्ही दिल्लीचे खिळे काढल्याशिवाय येथून परतणार नाही.

राहुल गांधींच्या हम दो हमारे दो या वक्तव्याशी सहमत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. राहुल गांधी म्हणाले होते की, चार लोक देश चालवत आहेत. हम दो और हमारे दो. राहुल यांच्या या वक्तव्यावर शुक्रवारी टिकैत म्हणाले की, हो हे सत्य आहे, असे वाटते की, देश चार लोकच चालवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...