आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 50 वा दिवस आहे आणि आजच सुप्रीम कोर्टाकडून स्थापन झालेल्या कमेटीमधून भूपिंदर सिंग मान यांनी आपले नाव परत घेतले आहे. यानंतर शेतकरी आणि केंद्रादरम्यान बातचीतवर सस्पेंन होता. पण, आता केंद्र सरकारने म्हटले आहे की, आम्ही शुक्रवारी शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्यास तयार आहोत. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, आम्हाला येणाऱ्या बैठकीत सकारात्कम बातचीत होण्याची आशा आहे.
कायदा परत घेईपर्यंत आंदोलन सुरू राहिल : टिकैत
भारतीय किसान यूनियन (BKU)चे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, जर सरकार पाच वर्षे काम करू शकते, तर आम्ही इतक्या दिवस आंदोलन का करू शकत नाहीत. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करतो, पण कमेटीकडून खुश नाहीत. जोपर्यंत कायदे परत घेणार नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहिल.
18 जानेवारीला महिला आंदोलन करणार
बुधवारी दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या विविध संस्थांच्या दिवसभर बैठका झाल्या. शेतकरी संघटनांनी दावा केला आहे की, लोहरीवर पंजाबसह संपूर्ण देशातून 20 हजारांपेक्षा जास्त महिला या आंदोलनात सहभागी होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.