आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kisan Andolan Delhi Burari LIVE Update | Haryana Punjab Farmers Delhi Chalo March Latest News Today 19 January

शेतकरी आंदोलनाचा 55 वा दिवस:सिंघू बॉर्डरवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये बैठक सुरू, 26 जानेवारीला होणाऱ्या ट्रॅक्टर मार्चबाबत चर्चा सुरू

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधींनी कृषी कायद्यांवर बुकलेट रिलीज केली

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 55 वा दिवस आहे. 26 जानेवारीला होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने सोमवारी म्हटले होते की, हे कायदे आणि सुव्यवस्थेशी निगडीत प्रकरण असल्यामुळे, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना येण्यास परवानगी देण्याबाबत पोलिस निर्णय घेतील.

राहुल गांधींनी कृषी कायद्यांवर बुकलेट रिलीज केली

कृषी कायद्याच्या मुद्द्यांवरुन सरकारवर आरोप करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस हेडकॉर्टरवर एक बुकलेट रिलीज केली आहे. यात कृषी कायद्यातील त्रुटी दाखवण्यात आल्या आहेत. या बुकलेटचे टायटल 'शेतीचा खून' ठेवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची उद्या सरकारसोबत बैठक

शेतकरी आणि सरकारमध्ये आज 11 व्या वेळेस चर्चा होणार होती. पण, काही कारणास्तव ही बैठक मंगळवारऐवजी बुधवारी करण्याचे ठरले. यापूर्वी झालेल्या 10 पैकी 9 बैठका निष्फळ ठरल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...