आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी आणि केंद्र सरकारमधील आजच्या 9व्या बैठकीमध्येही तोडगा निघाला नाही. 44 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. बैठकीत शेतकरी नेत्यांनी पोस्टर दाखवले, ज्यावर गुरुमुखीमध्ये लिहीले होते- 'मरणार किंवा जिंकणार.' बैठकीनंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, '50% मुद्द्यांवर सहमती झाली आहे. पुढील बैठक 15 जानेवारीला घेण्याचा निर्णय घेतला आहे.'
बैठकीत नेमके काय झाले...?
1. शेतकरी सरकारला म्हणाले- लोकांचे म्हणने कमी ऐकले जाते
तुम्ही आपल्या हट्टावर अडून आहात. तुम्ही आपआपल्या सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरीला कामाला लावता. ते कोणते, ना कोणते लॉजिक लावत असतात. तुम्ही निर्णय घ्या, कारण तुम्ही सरकार आहात. बहुदा लोकांचे म्हणने कमी ऐकले जाते. ज्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांचेच ऐकले जाते. इतक्या दिवसांपासून फक्त चर्चा होत आहे. असे वाटत आहे की, तुम्हाला हे प्रकरण शांत करण्यात रस नाही. वेळ वाया कशाला घालवता ? तुम्ही स्पष्टपणे आपले मत आम्हाला लिहून द्या, आम्ही येथून निघून जाऊ. - बलबीर सिंह राजेवाल, भारतीय किसान यूनियनचे नेते.
2. आम्ही कोर्टात जाणार नाहीत
बैठकीत वातावरण चांगलेच तापले होते. आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की, कायदा परत घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाहीत. आम्ही कोणत्याच कोर्टात जाणार नाहीत, कायदा परत घ्या, अन्यथा आमची लढाई सुरुच राहील. लढणार किंवा मरणार. आधी ठरवल्यानुसार, 26 जानेवारीला परेड काढणारच. - हन्नान मुल्ला, ऑल इंडिया किसान सभेचे जनरल सेक्रेटरी.
3. सरकारने आमचे आणि आम्ही सरकारचे म्हणने ऐकले नाही
तारीखवर तारीख मिळत आहे. बैठकीत सर्व शेतकरी नेत्यांनी एका सुरात कायदा परत घेण्याची मागणी केली. आम्ही कायदा परत घेण्याची मागणी केली, तर सरकारने संशोधन करण्याचा प्रस्ताव मांडला. सरकारने आमचे ऐकले नाही, म्हणून आम्ही सरकारचे ऐकले नाही.- राकेश टिकैत, भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते.
Sponsored By
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.