आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kisan Andolan Delhi Burari : The Farmers Rejected The Central Government's Proposal To Set Up A Committee To Discuss The Agriculture Act

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकार-शेतकऱ्यांमध्ये 120 मिनिटे चर्चा:कृषी कायद्याबाबत चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारशी बोलण्यासाठी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पोहोचलेले शेतकरी संघटनांचे नेते - Divya Marathi
सरकारशी बोलण्यासाठी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पोहोचलेले शेतकरी संघटनांचे नेते
  • हरियाणाचे अपक्ष आमदार सोमबीर सांगवान यांनी खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेतला

नवीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी नेत्यांची केंद्रासोबतच्या पहिल्या टप्प्यातील चर्चा संपली आहे. या कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावला आहे. सरकारने मंगळवारी दुपारी तीन वाजता शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत केंद्राने शेतकऱ्यांसमोर नवीन समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या समितीत सरकार व शेतकरी प्रतिनिधींव्यतिरिक्त तज्ञांना ठेवावे असे म्हटले होते. या बैठकीत केंद्राने शेतकऱ्यांना मिनिमम सपोर्ट प्राइज (MSP) विषयी प्रेझेन्टेशनही दिले.

केंद्र सायंकाळी 8 वाजता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्ली यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांसमवेत बैठक होण्यापूर्वी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले होते की, आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून पुढचा मार्ग ठरवू. या बैठकीत तोमर यांच्यासोबत वाणिज्य मंत्री सोम प्रकाश आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते.

सरकारच्या आवाहनावर शेतकर्‍यांनी सांगितले होते की, सरकारने बैठकीची तयारी दर्शवली कारण यावेळी त्यांनी कोणतीही अटी ठेवलेली नाही. दरम्यान, हरियाणाचे अपक्ष आमदार आणि सांगवान खापचे प्रमुख सोमबीर सांगवान यांनी खट्टर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. चरखी दादाडीमध्ये सांगवान म्हणाले- शेतकऱ्यांवर होणारे अत्याचार पाहून मी सरकारकडून पाठिंबा काढून घेतो.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser