आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kisan Andolan, Delhi Red Fort, News And Update; Haryana Punjab Farmers Republic Day Tractor Rally Violence | 300 Police Personnel Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंसाचारानंतर आंदोलनात फूट:15 मिनीटांच्या अंतरात दोन शेतकरी संघटनांची आंदोलनातून माघार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीवघेणा हल्ला आणि दरोडा प्रकरणातील कलमांर्तगत गुन्हे दाखल

कृषी कायद्याच्या निषेधार्थ 26 जानेवारी रोजी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांवर आतापर्यंत 22 FIR नोंदविण्यात आल्या असून, 200 पेक्षा जास्त समाज कंटकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात जीवघेणा हल्ला आणि दरोडा प्रकरणातील कलमांतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, कारवाईच्या काही वेळातच शेतकरी संघटना आंदोलनातून माघार घेतल्याचे दिसत आहे. आज(दि.27) सायंकाळी साडेचार वाजता शेतकरी मजुर संघटनेने आंदोलनातून माघार घेतल्याचे जाहीर केले. याच्या 15 मिनीटानंतर भारतीय शेतकरी यूनियननेही आंदोलनातून माघार घेतली.

राष्ट्रीय शेतकरी मजुर संघटनेचे चीफ वीएम सिंह म्हणाले की, दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराची संपूर्ण जबाबदारी भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी घ्यावी. आम्ही अशा दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीसोबत हे आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि या आंदोलनातून माघार घेतल्याचे जाहीर करतो.

तिकडे, भारतीय शेतकरी यूनियन (भानु) चे अध्यक्ष भानुप्रताप सिंह म्हणाले की, मंगळवारी दिल्लीत जे काही झाले, त्यामुळे खूप दुःख झाले आहे. आम्ही मागील 60 दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेत आहोत. शेतकऱ्यांना उपाय हवाय, पण काही लोकांनी त्यांना पागल ठरवले. शेतकऱ्यांनी अशा नेत्याच्या मागे लागू नये, जो आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलिसांचा दावा- आंदोलक दारू पिऊन आले होते

पोलिसांचा दावा आहे की, ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 जवान जखमी झाले. तसेच, काही जणांनी जवानांकडून अश्रुगोळे सोडणारी गन हिसकाऊन घेतलो होती. एका व्यक्तीकडे ती लाल किल्यात पाहण्यात आली होती. दरम्यान, उत्तर दिल्लीचे कार्यकारी DCP संदीप यांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांनी दारू पिलेली होती. त्यांनी आमच्यावर तलवार आणि लाठ्या-काठ्याने हल्ला केला.

FIR मध्ये 6 शेतकरी नेत्यांचे नावे

पोलिसांनी जी FIR दाखल केली आहे, त्यातील एका एफआयआरमध्ये 6 शेतकरी नेत्यांची नावे सामील आहेत. यात- राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबीर सिंह राजेवाल, बूटा सिंह बुर्जगिल आणि जोगिंदर सिंह आहेत. यांच्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीतील नियम मोडल्याचा आरोप आहे.

पोलिसांचा दावा-हिंसेत 300 जवान जखमी झाले

दरम्यान, उपद्रव्यांची ओळख पटण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याशिवा, लाल किल्ला आणि सिंघू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मेट्रो व्यवस्थापनाने आज पुन्हा लाल किल्ला आणि जामा मशीद मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की, काल झालेल्या हिंसाचारात 300 पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. एका अॅडिशनल DCP वर तलवारने हल्ला करण्यात आला.

लाल किल्यावर रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात

पोलिसांनी सिंघू आणि टीकरी बॉर्डरवर सुरक्षा वाढवली आहे. येथूनच शेतकरी आंदोलन सक्रीय झाले होते. तिकडे, लाल किल्यावरदेखील सुरक्षा वाढवली आहे. तिथे सध्या रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे परिसरात लक्ष्य ठेवले जात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रह्लाद पटेल यांनी बुधवारी लाल किल्या जाऊन नुकसानीची पाहणी केली.