आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतकरी आंदाेलनात सहभागी लाेकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी टिकरी व सिंघू सीमेवर किसान माॅल सुरू करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय एनजीआे खालसा अॅड इन हा माॅल चालवताेय. येथे शेतकऱ्यांना माेफत टूथब्रश, टूथपेस्ट, साबण, कंगवा, चप्पल, तेल, शाम्पू, अंतर्वस्त्रे, हिटिंग पॅड, गार्बेज बाॅक्स इत्यादी सामान मिळू लागले आहे. माेठ्या जथ्थ्यासाठी गीझर, वाॅशिंग मशीन इत्यादी सामानही माेफत उपलब्ध हाेत आहे. खालसा एडचे लाेक म्हणाले, हा माॅल चालवण्यासाठी देशभरातून आर्थिक मदत मिळू लागली आहे. माॅलमधून सामान घेण्यासाठी लाेकांनी गर्दी करू नये यासाठी टाेकन पद्धती लागू करण्यात आली आहे. माॅल संचालकांच्या वतीने धरणस्थळी फिरून शेतकऱ्यांना टाेकन दिले जातात.
ते या टाेकनला माॅलमध्ये दाखवून माेफत सामान मिळवू शकतात. स्वयंसेवक कुलवीरसिंह म्हणाले, टिकरी सीमेवर माॅल सुरू झाला हाेता. वास्तवात ताे सिंघू सीमेवर माॅल करण्याचे ट्रायल रन हाेते. आम्ही त्यात यशस्वी झालाे आहाेत. आता येथेही माॅल सुरू हाेणार आहे.
ते म्हणाले, टिकरी सीमेवर माॅल सुरू झाल्यानंतर खूप गाेंधळ उडाला हाेता. लाेकांची प्रचंड गर्दी झाली हाेती. त्यामुळे आम्ही टाेकन पद्धती चालू केली. सामान्यपणे दररात्री ६०० ते ७०० टाेकन वाटले जातात. पुढच्या दिवशी शेतकऱ्याला माॅलच्या प्रवेशद्वारावर टाेकन दाखवावे लागतात. त्यानंतर एक पावती दिली जाते. त्यात नाव, माेबाइल क्रमांक, आधार क्रमांक नाेंदवावा लागताे. त्यानंतर गरज असलेल्या सामानावर टिक केले जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना प्रवेश मिळताे.
या माॅलमधून सामान मिळवणारे शेतकरी म्हणाले, मला रांगेत उभे राहण्यासही काही अडचण नाही. शेतकऱ्यांच्या भलाईसाठी आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी हा माॅल सुरू झाला आहे. काही शेतकऱ्यांनी मात्र टाेकन मिळत नसल्याची तक्रार केली आहे. आंदाेलनस्थळी मागील बाजूला शेतकरी आहेत. त्यांच्यापर्यंत टाेकन पाेहाेचत नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.