आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Kisan Sansad' On Jantar Mantar; After Six Months In Delhi, The Farmers' Agitation Broke Out Again

पावसाळी अधिवेशन:जंतर-मंतरवर ‘किसान संसद’; दिल्लीत सहा महिन्यांनंतर पुन्हा शेतकरी आंदाेलक धडकले

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 दिवस दरराेज सहा तास चालणार किसान संसद

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विराेधात गुरुवारी दिल्ली ‘सडक ते संसद’ शेतकऱ्यांच्या आंदाेलनाने दणाणून गेली. सुमारे २०० शेतकरी संसदेजवळील जंतर-मंतरला पाेहाेचले हाेते. दिल्लीच्या सिंघू सीमेवर धरणे हाेती. त्यानंतर संयुक्त किसान माेर्चाचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बसने जंतर-मंतरला दाखल झाले. शेतकऱ्यांकडे आेळखपत्र तसेच संघटनेचे ध्वज हाेते. शेतकरी नेते शिवकुमार कक्का म्हणाले, पाेलिसांनी रस्त्यात आमच्या बसला तीन ठिकाणी राेखले. शेतकऱ्यांच्या आधार कार्डाची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी जंतर-मंतरवर घाेषणाबाजी केली. त्यांनी सरकारकडून तीन कृषी कायदे रद्दबातल करावेत, अशी मागणी केली. टिकैत म्हणाले, शेतकरी आपली संसद चालवतील. सगळ्या खासदारांनी शेतकऱ्यांची मागणी लावून धरावी. खासदारांनी आवाज उठवला नाही तर त्यांच्यावर मतदारसंघात टीका हाेईल. आम्ही शेतकरी नेते प्रेम सिंह भंगू म्हणाले आम्ही किसान संसदेत अध्यक्ष करतील. विस्ताराने चर्चा केली जाईल. प्रश्नाेत्तराचा तासही हाेईल. हा मुद्दा मान्सून सत्रादरम्यान दाेन्ही सभागृहांत गाजला. विराेधकांनीही हा मुद्दा मांडला. लाेकसभा, राज्यसभेची कार्यवाही स्थगित करावी लागली.

आम्ही निर्भय, एकजुटीने उभे : राहुल गांधी
किसान संसदेच्या सुरूवातीलाच राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले, ते असत्य, अन्याय व अहंकारात आहेत. आम्ही सत्याग्रही, निर्भय व एकजूट आहोत. याबरोबरच संसदेबाहेरील गांधी पुतळ्यासमोरील धरणे आंदोलनाचे छायाचित्रही त्यांनी पोस्ट केले आहे. सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे.

आम्ही अजूनही शेतकऱ्यांशी चर्चेस तयार : कृषिमंत्री
कृषिमंत्री नरेंद्र सिंह ताेमर म्हणाले, आम्ही नवीन कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांचा काही मुद्यांवर आक्षेप असल्यास त्यांनी ताे सांगावा. सरकार अजूनही शेतकऱ्यांशी चर्चेस तयार आहे. सहा महिन्यांपूर्वी २२ जानेवारी राेजी शेतकरी व सरकार यांच्यातील वाटाघाटी फिस्कटल्या हाेत्या. शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आठ महिन्यांपासून धरणे आंदाेलन करत आहेत.

19 दिवस दरराेज सहा तास चालणार किसान संसद
दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी जंतर-मंतरवर शेतकऱ्यांना आंदाेलनासाठी परवानगी दिली. ही परवानगी २२ जुलैपासून ९ आॅगस्टपर्यंत १९ दिवस चालेल. शेतकरी दरराेज सहा तास सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदाेलन करतील. त्यांना संसदेच्या समाेर आंदाेलनाची परवानगी मिळालेली नाही. दहा महिन्यांपूर्वी केंद्राच्या तीन कायद्यांना मंजुरी मिळाली हाेती.

संघर्ष समितीचे सहा नेते टिकैत यांच्यासह दाखल
जंतर-मंतरवर संयुक्त किसान मोर्चाचे २२ नेत्यांव्यतिरिक्त बीकेयूचे राकेश टिकैतही सहभागी झाले. सोबतच संघर्ष समितीचे अन्य सहा प्रतिनिधी देखील आले आहेत.यंदा २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत लाल किल्ल्यावर निदर्शने केली हाेती. तेव्हा हिंसाचार झाला हाेता. ते लक्षात घेऊन पाेलिस सतर्क आहेत. आंदाेलनामुळे पाेलिसांनी दिल्लीतील सुरक्षेत वाढ केली आहे. पाेलिस अधिकारी परविंदर सिंह म्हणाले, टिकरी सीमेवरून आंदाेलक शेतकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी परवानगी नाही.

बातम्या आणखी आहेत...