आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Know About Glorious, Mythical City Of Prosperity Ayodhya ; 7 Ranked First Among The Sacred Holy Cities

अयोध्येला जाणून घेऊ:वैभवसंपन्न, ऐश्वर्याची पौराणिक नगरी; 7 पाैराणिक पवित्र शहरांत पहिल्या क्रमांकावर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्कंद पुराणानुसार अयाेध्या भगवान विष्णू यांच्या चक्रावर वसली आहे

भगवान श्रीरामांची जन्मभूमी अयाेध्या रघुवंशी राजांची प्राचीन राजधानी हाेती. नगरीच्या नावाचा अर्थ- अ-युद्ध म्हणजेच जेथे युद्ध हाेत नाही. पूर्वी ही काैशल जनपदची राजधानी हाेती. वाल्मीकी रामायणात अयाेध्यापुरीचे वर्णन सविस्तरपणे वर्णिलेले दिसून येते.

७ पाैराणिक पवित्र शहरांत पहिल्या क्रमांकावर

अयाेध्येची गणना भारतातील प्राचीन सप्तपुरीत पहिल्या क्रमांकावर करण्यात आली. हिंदू पाैराणिक इतिहासात पवित्र ७ नगरांत अयाेध्या, मथुरा, माया (हरिद्वार), काशी, कांची, अवंतिका (उज्जैन) आणि द्वारकेचा यात समावेश हाेताे.

भगवान विष्णूच्या चक्रावर वसलेली अयाेध्या

स्कंद पुराणानुसार अयाेध्या भगवान विष्णू यांच्या चक्रावर वसली आहे. पाैराणिक कथेनुसार मनूने ब्रह्मांना एक नगर वसवण्यास सांगितले. ते त्यांना विष्णूकडे घेऊन गेले. विष्णूने साकेतधाम ठिकाण दाखवले. विश्वकर्माने अयाेध्यानगरीची निर्मिती केली.

इक्ष्वाकू कुळाचे राज्य, दशरथ ६३ वे राजे

ही नगरी विवस्वान (सूर्य) पुत्र वैवस्वत मनूने संपन्न केली. ब्रह्माचे पुत्र मरिची यांच्यापासून कश्यपाचा जन्म झाला. कश्यपाच्या पाेटी विवस्वान आणि विवस्वानचे पुत्र वैवस्वत मनू. वैवस्वत यांना १० मुले हाेती. इल, इक्ष्वाकू, कुशनाम, अरिष्ट, धृष्ट ,नरिष्यन्त, करुष, महाबली, शर्याती, पृषध अशी त्यांची नावे. त्यात अनेक महान प्रतापी राजे, ऋषी व अरिहंत झाले. याच वंशाचे राजा दशरथ ६३ वे शासक हाेते.

संपन्नतेबाबत अयोध्येची तुलना स्वर्गाशी

अयोध्येला अथर्व वेदात ईश्वराची नगरी असे संबोधले आहे. या नगरीच्या संपन्नतेची तुलना स्वर्गाशी केली आहे. स्कंद पुराणानुसार अयोध्या शब्द ‘अ’ कार ब्रह्मा, ‘य’ कार विष्णू तर ‘ध’ कार रुद्राचे स्वरूप आहे. रामाचे पुत्र कुशने अयोध्येची पुननिर्मिती केली होती.

ऋषभ देवजींसह ५ तीर्थंकरांचे जन्मस्थान

लाला सीताराम भूप लिखित -‘अयोध्या का इतिहास’ व अलाहाबाद विद्यापीठातील इतिहास तज्ञ डॉ. हेरंब चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार २४ जैन तीर्थंकरांपैकी पहिले ऋषभदेव यांच्यासह ५ तीर्थंकरांचा जन्म अयोध्येत झाला होता. ते इक्ष्वाकू कुळाशी होते.

> अयोध्येस साकेतही म्हटले जात. भगवान बुद्ध अयोध्येत १६ वर्षे वास्तव्यास होते.

> अयोध्या : लेखक हँस बेकर यांच्या मते अयोध्येत सात तीर्थंकरांचा जन्म झाला होता.

बातम्या आणखी आहेत...