आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kolkata: 25 Metro Stations Are Closely Monitored, If There Is Any Doubt, Inquiries Are Made...this Helps In Preventing Suicide.

खबरदारी:कोलकाता : 25 मेट्रो स्थानकांवर बारकाईने लक्ष, काही शंका असल्यास होते चौकशी...यामुळे आत्महत्या रोखण्यात होते मदत

बबिता माळी . कोलकाता17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी आत्महत्येसाठी आलेल्या पाच जणांना वाचवले, देखरेखीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष - Divya Marathi
या वर्षी आत्महत्येसाठी आलेल्या पाच जणांना वाचवले, देखरेखीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष

कोलकाता मेट्रोच्या कोणत्याही स्थानकात प्लॅटफॉर्मवर कोणी व्यक्ती अाली, पण ती मेट्रोमध्ये चढत नसेल, तर प्लॅटफॉर्मवर तैनात पाेलिसांना ताबडतोब नियंत्रण कक्षातून सूचना दिली जाते. तसेच त्या व्यक्तीवर लक्ष ठेवा, असे सांगितले जाते. दुसरी किंवा तिसरी मेट्रो आल्यानंतरही व्यक्तीने प्रवास सुरू केला नाही तर आरपीएफ जवान चौकशी सुरू करतात. ती व्यक्ती आत्महत्येच्या इराद्याने आली असल्याची थोडीशीही शंका त्यांना आल्यास ते स्टेशन मास्तरांच्या दालनात घेऊन जातात आणि कुटुंबीयांना माहिती देतात.

या उपक्रमामुळे यंदा पाच जणांना अात्महत्या करण्यापासून राेखण्यात अाले आहे. कोलकाता मेट्रोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा म्हणतात, “एकेकाळी आत्महत्यांच्या घटनांनी मला अस्वस्थ केले होते. या प्रयत्नानंतर ब्लू लाइन म्हणजेच उत्तर ते दक्षिण मेट्रोमध्ये आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. ब्ल्यू लाइनमधून दररोज साडेसहा लाख प्रवासी प्रवास करतात. वास्तविक तिची रचना जुनी असल्यामुळे या मेट्रोला प्लॅटफॉर्म स्क्रीनचा दरवाजा नाही. त्यामुळे अशा व्यक्ती क्षणार्धात असे कृत्य करत मित्रा म्हणाले की, मेट्रोच्या नियंत्रण कक्षाकडून ब्ल्यू लाइनच्या कवी सुभाष ते दक्षिणेश्वरपर्यंतच्या सर्व २५ स्थानकांवर प्रत्येक प्रवाशाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते.

नियंत्रण कक्षाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, ‘मेट्रोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,’ असा कल दिसला की, कोणी आत्महत्येच्या इराद्याने आले, तर ते देहबोलीवरून कळते. अशी व्यक्ती मेट्रोमध्ये चढण्याऐवजी थांबते. मग संधी बघून ती असे कृत्य करते. नियंत्रण कक्षात उपस्थित अनुभवी अधिकारी तात्काळ कारवाई करून जीव वाचवतातअनुचित घटना टाळण्यासाठी संशोधन
मित्रा सांगतात की, अनुचित घटना टाळण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. लहान व्हिडिओ दाखवून आणि घोषणांद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय अडथळे शोधण्याच्या यंत्रणेसारखे नवीन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. मेट्रो रेल्वे पोलिस दलाचे निवृत्त अधिकारी जगदीश जाना सांगतात की, पूर्वी दरवर्षी २५-३० आत्महत्या होत असत. त्यापैकी फक्त १० टक्के व्यक्तींना वाचवता येत असे, अाता ही संख्या ७० टक्क्यांपर्यंत वाढली अाहे.