आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kolkata Man Trishul Inserted His Neck; Reached Hospital After Traveling 65KM | Marathi News

तरुणाच्या गळ्यात घुसला 150 वर्षे जुना त्रिशूळ:शस्त्रक्रियेसाठी 65KM प्रवास करून रुग्णालयात पोहोचला, जीव वाचला

नदिया2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दीडशे वर्ष जुना त्रिशूळ एका तरुणाच्या गळ्यात घुसला. त्याला उपचारासाठी 65 किमी दूर असलेल्या कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. भास्कर राम असे पीडित तरुणाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात रामवर राजधानीतील नीलरतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या गळ्यात घुसलेला त्रिशूळ सुमारे 30 सेमी लांब होता.

रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचला
त्रिशूळ लागलेल्या रामचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोनुसार, त्रिशूळ त्याच्या मानेच्या उजव्या बाजूने घुसला आणि डाव्या बाजूने बाहेर पडला. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचला. त्याला पाहून रुग्णालयात उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले होते.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कसलीही अस्वस्थता नव्हती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रामने दुखण्याची तक्रारही केली नाही. ऑपरेशनपूर्वी तो शांत होता.

कोणतीही हानी नाही
डॉक्टरांनी सांगितले की त्यांना रामच्या जगण्याबद्दल शंका होती, परंतु त्रिशूळ त्याच्या घशात असूनही कोणतेही अवयव, मज्जातंतू किंवा धमन्यांना इजा झाली नव्हती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या चेहऱ्याच्या आतील भागाला कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. ही केस त्यांच्यासाठी आश्चर्यापेक्षा कमी नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्रिशूळ त्याच्या गळ्यात कसे घुसले याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...