आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प. बंगालची राजधानी कोलकातामध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर होत आहे. १.५ कोटी लोकसंख्येच्या शहरात २१ लाखांपेक्षा जास्त लोक बाधित आहेत. यातील बहुतांशी लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. देशाच्या दुसऱ्या भागाच्या उलट येथे झोपडपट्टीपेक्षा जास्त रुग्ण अपार्टमेंटमध्ये आढळत आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी आहे, तर मृत्यूही वाढत आहेत. डॉक्टरांनुसार आरोग्य सुविधा नसल्याने आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे असे होत आहे. आयसीएमआरने २६ जूनला इशारा दिला होता की, कोलकाता शहर सामुदायिक संसर्गाच्या दिशेने जात आहे. कोलकाता प्रमाणेच हावडा, हुगली, २४ परगाना जिल्ह्यात सर्वाधिक ८३% कोरोना रुग्ण आहेत आणि ९३% मृत्यूही येथेच झाले आहेत. कोलकातामध्ये आतापर्यंत संसर्गाची ७१०८ प्रकरणे आढळली आहेत. यातील २२८८ रुग्ण अजूनही अॅक्टिव्ह आहेत. दुसऱ्या क्रमांकावर २४ परगाना जिल्हा आहे. येथे ३७६० प्रकरणे आहेत. राज्यांच्या बाधितांच्या यादीत बंगाल २२१२६ रुग्णांसह आठवे राज्य आहे. राज्यात आतापर्यंत ७५७ मृत्यू झाले आहेत.
कोलकाताचा उत्तर भाग जुने शहर आहे. बेलगछिया, खिदिरपूर, काशीपूर, घोष बगान, सौदागरपट्टी सारख्या बहुतांश झोपडपट्टीचा भाग आहे. बेलगछियाच्या गल्ल्या एवढ्या अरुंद आहेत की, दुपारीही सूर्याची किरणे रस्त्यांवर येत नाहीत. ही शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. येथे ५० हजारांपेक्षा जास्त लाेक राहतात. हाच शहरातील पहिला हॉटस्पॉट होता. गेल्या ७ दिवसांत कोलकातामध्ये १८ नवे कंटेनमेंट झोन झाले आहेत. दक्षिण कोलकातामध्ये झोपडपट्टी नाही. येथे बहुतांशी रुग्ण बहुमजली इमारतीत आढळत आहेत. कोलकाता मनपाने सरकारला दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, काेलकातातील कोरोना रुग्णातील जवळपास १५% च झोपडपट्टीतील आहेत, उर्वरित अपार्टमेंटमधील आहेत. सुरुवातीच्या दिवसात याच्या उलट होते, तेव्हा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण झोपडपट्टीतच आढळत होते. असोसिएशन आॅफ हेल्थ सर्व्हिस डॉक्टर्सचे सरचिटणीस डॉ. मानस गुमटा सांगतात की, कोलकाता कोरोना संसर्गाचा ज्वालामुखी झाला आहे. कोठे तरी उणीव राहिली आहे. स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत त्या तुलनेत सुविधा नाहीत. राजधानीत ७ शासकीय कोविड रुग्णालयातील ८०% भरल्या आहेत.
२६ जूनला आयसीएमआरने म्हटले होते- १४.३९% च्या वेगाने कोलकात्यात वाढतोय संसर्ग
कोरोनाच्या प्रकरणात कोलकाता कसा सामूहिक संसर्गाच्या दिशेने जात आहे हे २६ जूनलाच स्पष्ट झाले होते. राज्याच्या कोणत्या भागात संसर्गाचे प्रमाण किती आहे, हे जाणून घेण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) अलीपूरदुआर, बांकुडा, झाडग्राम, साउथ २४ परगाना, पूर्व मेदिनीपूर आणि कोलकातामध्ये २३९६ नमुने तपासले होते. यातील सर्वाधिक १४.३९% संसर्गाचे प्रमाण कोलकातात आढळले. दुसऱ्या क्रमांकावर साउथ २४ परगाना होता. सध्या कोलकातासह हावडा, हुगली, उत्तर- दक्षिण २४ परगानामध्येच सर्वाधिक ८३% कोरोना रुग्ण आहेत. आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सरकारला अहवाल सादर करत सावध केले होते. ज्या प्रमाणात संसर्ग वाढतोय त्या नुसार १.५ कोटी लोकसंख्येत २१ लाख जण बाधित होऊ शकतील. त्यानंतर सावधानता म्हणून सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवले. शाळा, अंगणवाडी केंद्र, चित्रपट गृह, जिम, जलतरण तलाव, बाग, नाट्यगृह, मेट्रो, बार बंद आहेत. इतर सर्व खुले आहे आणि लोक बेपर्वा आहेत.
फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवण्याची कुटुंबीयांवर वेळ, शवागृहे करताहेत टाळाटाळ
स्थिती समजून घेण्यासाठी १ ते ३ जुलै दरम्यानच्या ३ घटना पुरेशा आहेत. उत्तर कोलकातातील एका कुटुंबाला ७१ वर्षीय ज्येष्ठाचा मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीजर घ्यावा लागला. ज्या दिवशी त्यांचे नमुने घेतले त्याच दिवशी मृत्यू झाला. मात्र, ४८ तास अहवाल न मिळाल्याने कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्रही मिळाले नाही. अहवाल नसल्याने शव ठेवण्यासाठी कोणतेही शवागृह तयार नव्हते. २ जुलै रोजी उल्टाडांगा भागात एका ५५ वर्षांच्या मिठाई दुकानाच्या व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेहही मिठाईच्या फ्रीजरमध्ये ठेवावा लागला. मृत्यूच्या १८ तासांनंतर अंत्यसंस्कार झाले. या घटनांवरून दिसते की, शहरात महामारी आणि उपचाराची काय स्थिती आहे. कोलकाता मनपाचे प्रशासक फिरहाद हकीम यांचा आरोप आहे की, खासगी प्रयोगशाळेतून चाचणीची योग्य माहिती वेळेवर सरकारकडे येत नाही, यामुळेच समस्या वाढत आहे. एका डॉक्टराने सांगितले की, ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे त्यांना बेवारस शव जाळतात तेथे जाळले जात आहे.
कोराेना रोखण्यासाठी आतापर्यंतच्या उपाययोजना
> आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि मुंबई, गुजरात, चेन्नई, दिल्ली, पुण्याहून येणाऱ्या देशांतर्गत उड्डाणांवर बंदी.
> रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी १ जुलैपासून सर्दी, खोकला झाल्यास टेलिमेडिसन सेवा सुरू.
> ३ कोटी मास्क विकत घेण्याची तयारी, ते सामान्य लोकांना वाटणार.
> कोरोनावर विजय मिळवणाऱ्यांचा कोविड वॉरियर क्लबची स्थापना. रुग्णांची काळजी घेण्यासाठी मदत करणार. सुरुवात बहरामपूरहून झाली. वॉरियर्सना मुर्शिदाबाद, मालदा आणि कोलकाता वैद्यकीय महाविद्यालयात नेमणार. ते कोविड रुग्णांना जेवण देणार. त्यांची हिंमत वाढवणार. यासाठी सरकार पैसे देणार. तसेच सरकारने शाळांमध्ये नोवल कोरोना विषाणू आणि कोविड- १९ चा पुढील सत्रापासून अभ्यासक्रमात समावेश केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.