आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Koo Handle Uspended On Twitter Koo Co Founder Attack On Elon Musk | Koo Vs Twitter

ट्विटरने 'Koo'चे अकाऊंट केले निलंबित:'कू'चे सह-संस्थापक मस्कवर संतापले; म्हणाले- हे कसले भाषण स्वातंत्र्य

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटरने भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Kooचे अकाउंट निलंबित केले आहे. @kooeminence हे ट्विटर हँडल, जे युजर्सच्या प्रश्नांसाठी सुरु करण्यात आले होते. शुक्रवारी हे काउंट सस्पेंड करण्यात आले. यापूर्वी, ट्विटरने न्यूयॉर्क टाइम्स, सीएनएन आणि वॉशिंग्टन पोस्टसह अनेक प्रमुख जागतिक पत्रकारांची खाती निलंबित केली होती.

कू चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “हँडल का निलंबित करण्यात आले हे आम्हाला माहित नाही. कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांनी एक ट्विट केले की, 'कुच्‍या हँडलवर बंदी घातली आहे'. का? कारण आम्ही ट्विटरशी स्पर्धा करतो? हे कोणत्या प्रकारचे भाषण स्वातंत्र्य आहे आणि आपण कोणत्या जगात राहत आहोत? इथे काय होत आहे @elonmusk?

जगातील दुसरी सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग साइट आहे Koo

गेल्या महिन्यात, कंपनीचे सह-संस्थापक मयंक बिद्वतका यांनी सांगितले की, कू आता जगातील दुसरे सर्वात मोठे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म बनले आहे. त्याच्या वापरकर्त्यांची संख्या 5 कोटी (50 मिलियन) ओलांडली आहे.

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भारताव्यतिरिक्त कु अ‍ॅप सध्या अमेरिका, युनायटेड किंगडम, सिंगापूर, कॅनडा, नायजेरिया, यूएई, अल्जेरिया, नेपाळ आणि इराणसह 200 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. कु 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Koo अ‍ॅप मार्च 2020 मध्ये लाँच करण्यात आले

Koo हे नेटिव्ह मायक्रो-ब्लॉगिंग अ‍ॅप म्हणून मार्च 2020 मध्ये लॉन्च केले गेले. Bombinet Technologies Pvt Ltd, बेंगळुरू यांनी कू बनवले आहे. हे अ‍ॅप भारताच्याच अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिद्वतका यांनी डिझाइन केले आहे.

ट्विटर टॉपवर

ट्विटरचे जगभरात 220 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. याचे अमेरिकेत 76 दशलक्ष आणि भारतात 23 दशलक्ष वापरकर्ते आहेत. जगभरात दररोज सुमारे 500 दशलक्ष ट्विट केले जातात. ट्विटर जुलै 2006 मध्ये सुरू झाले. त्याची स्थापना जॅक डोर्सी, नोहा ग्लास, इव्हान विल्यम्स आणि बिझ स्टोन यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...