आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kovind Meet Modi| Prime Minister Narendra Modi Meets President Ramnath Kovind | Security Lapses In Punjab; Big Action? | Marathi News

फिरोजपुर रॅली प्रकरण:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मोदींनी घेतली भेट, पंजाबमध्ये सुरक्षेत चूक; मोठी कारवाई होणार?

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात जाऊन मुलाखत घेतली आहे. पंजाबमध्ये बुधवारी पंतप्रधानांची रॅली होणार होती त्याविषयी तसेच सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींच्या सुरक्षेंवर चिंता व्यक्त केली आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी देखील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

देवेगौडा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेविषयी देशात मोठ्या प्रमाणात विवाद होत आहे. भारताच्या सर्वोच्च कार्यकारी कार्यालयाच्या संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा आपण कधीही आत्मसंतुष्ट होऊ नये. भूतकाळातून शिकले पाहिजे." असे ट्विट देवगौडा यांनी केले आहे.

उपराष्ट्रपती व्यकैय्या नायडू आणि मोदींमध्ये भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी फिरोजपुर येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करणार होते. रॅलीपासून सुमारे आठ किलोमीटर लांब एका फ्लायओवरजवळ पंतप्रधानाचा तोफा रोखण्यात आला होता. तेथे पंतप्रधानांचा ताफा वीस मिनीटे त्याठिकाणी उभाच होता.

बातम्या आणखी आहेत...