आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kozhikode Plane Crash News And Updates | Pilot's Non Adherence To SOP Probable Cause For Kozhikode Plane Crash AAIB Report; News And Live Updates

विमान अपघाताचा अहवाल:केरळमध्ये पायलटच्या चुकीमुळे कोसळले होते एअर इंडियाचे विमान, गेल्या वर्षी झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू

तिरुअनंतपुरमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • असा घडला अपघात

केरळच्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या अपघातासंदर्भात सरकारने अवहाल जारी केला आहे. पायलटने मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे अहवालातून समोर आले आहे. हा अपघात गेल्या वर्षी घडला असून यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला होता. पायलटच्या चूकी व्यतिरिक्त, सिस्टमेटिक फेल्योरची संभावना नाकारता येत नसल्याचे एअरक्राफ्ट अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने आपल्या 257 पानांच्या अहवालात म्हटले आहे.

असा घडला अपघात
एएआयबीने सरकारकडून जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, एसओपीकडे दुर्लक्ष करून वैमानिकाने अनस्टॅबलाइज्ड अॅप्रोच चालू ठेवला आणि टचडाउन पॉईंटनंतर विमान उतरवले. पायलटने अर्धी धावपट्टी ओलांडल्यानंतर लँडिंग केले. या दरम्यान, पायलट मॉनिटरिंगने गो अराउंड कॉल दिला होता. परंतु, वैमानिक यावेळी फ्लाइट कंट्रोल हातात घेऊ शकला नाही. ज्यामुळे हा अपघात झाला.

केरळमधील 4 विमानतळांपैकी कोझिकोडला सर्वात लहान धावपट्टी आहे. हे विमानतळ उंचीवर असल्याने विमान घसरण्याचा धोका नेहमीच असतो.
केरळमधील 4 विमानतळांपैकी कोझिकोडला सर्वात लहान धावपट्टी आहे. हे विमानतळ उंचीवर असल्याने विमान घसरण्याचा धोका नेहमीच असतो.

येथे अनेकवेळा झाले आहे अपघात

  • 7 नोव्हेंबर 2008 रोजी जेद्दाहून परतणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे एक पंख लँडिंग दरम्यान तुटले. यामुळे धावपट्टीचेही नुकसान झाले होते. परंतु, यामध्ये सर्व प्रवासी सुखरूप बचावले होते.
  • 9 जुलै 2012 रोजी एअर इंडिया एक्सप्रेसचे बोईंग धावपट्टीवरून घसरले. यावेळी विमानाचे लँडिंग गिअर धावपट्टीवरील दिव्यांशी धडकले. यामध्ये ही सर्व प्रवासी सुखरूप होते.
  • 25 एप्रिल 2017 रोजी कोझिकोड विमानतळावरून उड्डाण करताना एअर इंडियाचे इंजिन बिघडले आणि टायर फुटला. यामुळे टेक-ऑफ अचानक थांबवावे लागले.
  • 4 ऑगस्ट 2017 रोजी स्पाइसजेटचे विमान लँडिंग दरम्यान रनवेवरून घसरले.
बातम्या आणखी आहेत...