आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kozikod Plane Accident | Accident With Landing 1 Km Ahead Of Fixed Place Due To Lack Of Runway In Rain; The Pilot Had The Experience Of Landing 27 Times On This Runway

विमान दुर्घटना:पावसात धावपट्टी न दिसल्याने निश्चित जागेएेवजी 1 किमी पुढे लँडिंगने अपघात; पायलट साठेंना या रनवेवर 27 वेळा लँडिंगचा होता अनुभव

कोझिकोड/ नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅप्टन साठे सर्वात अनुभवी पायलट होते, 10 हजारांवर तासांच्या उड्डाणांचा अनुभव

केरळच्या कोझिकोड विमानतळावर शुक्रवार रात्री अपघात झालेले विमान धावपट्टीवरील लँडिंग पॉइंटच्या १ किमी पुढे उतरले होते. यामुळे विमान अनियंत्रित हाेऊन दरीत कोसळले. एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने शनिवारी सांगितले की, वैमानिक दीपक साठेंनी आधी रनवे-२८वर लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र, पावसात धावपट्टी दिसली नाही. मग रनवे-१० वर लँडिंगचा प्रयत्न केला. २.७ किमी धावपट्टीवर लँडिंग निर्धाारित पॉइंटपेक्षा खूप पुढे झाली.

कोझिकोडमध्ये उड्डयनमंत्री हरदीप पुरी म्हणाले, साठे सर्वात अनुभवी वैमानिक हाेते. १० हजारांवर तासांच्या उड्डाणांचा अनुभव होता. येथेही त्यांनी २७ वेळा लँडिंग केेलेले होते. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन म्हणाले, साठेंनी आधीच इंजिन बंद केेल्याने विमानाला आग लागली नाही. शनिवारी मृतांची संख्या १८ वर गेली. एक मृताला कोरोना असल्याने बचावकार्यातील पथकाला क्वॉरंटाइन केले. विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे.

आईच्या ८४ व्या बर्थडेला तिला सरप्राइझ देण्यासाठी जायचे होते

नागपूर | विमान अपघातात ठार मुख्य पायलट कॅ. दीपक साठेंच्या (५८) आई नीला यांचा शनिवारी ८४ वा वाढदिवस होता. आईला न कळवताच साठे नागपुरात जाऊन तिला सरप्राइझ देणार होते. मात्र हे अघटित वेदना देऊन गेले. शोकमग्न आई म्हणाली, ‘देवाने त्याच्याऐवजी मला न्यायचे होते. तो महान पुत्र होता. इतरांच्या मदतीसाठी सदैव पुढे असायचा. त्याने देशासाठी बलिदान दिले. अहमदाबादेत पुरात त्याने जवानांच्या मुलांना आपल्या खांद्यावर उचलून वाचवले होते.’ साठेंना कोरोनामुळे आईची काळजी होती. कॅप्टन साठे यांचे पुतणे डॉ. यशोधन साठे म्हणाले, त्यांनी मार्चमध्ये आपल्या कुटुंबाची भेट घेतली होती. साठे पत्नीसोबत मुंबई राहत होते.

दीड वर्षापूर्वी झाला विवाह, दहा दिवसांनी होईल अपत्यप्राप्ती...

मथुरा | या दुर्घटनेत सहवैमानिक अखिलेशकुमार भारद्वाज (३२) यांचाही मृत्यू झाला. दीड वर्षापूर्वी अखिलेश यांचा धौलपूरच्या मेघाशी विवाह झाला होता. मेघा गर्भवती आहे. डॉक्टरांनी दहा दिवसांनी प्रसूती होईल, असे सांगितले आहे. अखिलेशचा मृत्यू झाल्याचे तिला कसे सांगावे, हा कुटुंबासमोर प्रश्न आहे. तो जखमी झाल्याचेच सध्या कळवण्यात आले आहे. तुलसीराम यांच्या तीन मुलांपैकी अखिलेश सर्वात मोठा होता. २०१७ मध्ये अखिलेश एअर इंडियामध्ये भरती झाले होते. प्रत्येक उड्डाणापूर्वी ते घरी फोन करत. दुबईहून निघतानाही त्यांनी आई बालादेवी यांना फोन केला होता. २१ ऑगस्टपासून त्यांनी रजा टाकली होती. मात्र, नियतीला हे मान्य नसावे.

बातम्या आणखी आहेत...