आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kripashankar Singh's Target On Shiv Sena: BJP Leader Said Congress NCP Forming Government With Shiv Sena Cannot Be Benevolent Of North India

भाजपचा निशाणा:काँग्रेस, राष्ट्रवादीवर उत्तर भारतीय नाराज; कृपाशंकर सिंह म्हणाले- शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणारे काँग्रेस-राष्ट्रवादी उत्तर भारतीयांशी अनुकुल असू शकत नाहीत

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपची नजर उत्तर भारतीयांच्या मतांवर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर आता महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यामुळे मुंबईतील राजकारण तापले आहे. उत्तर भारतीय मोर्चाच्या चौपाल कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले, 'जे शिवसेनेसोबत सत्तेत आहेत जर त्यांच्यासोबत कोणीही उत्तर भारतीय समाज राहत असेल, तर ते उत्तर भारतीय समाजाचे असू शकत नाहीत असे मी दाव्यासह म्हणेन.'

कलम 370 चा संदर्भ देत कृपाशंकर म्हणाले की, जर काँग्रेस-राष्ट्रवादी उत्तर भारतीयांसाठी अनुकूल असतील तर शिवसेना सोडून सरकारमधून बाहेर पडा. 370 च्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडून गेलेल्या कृपाशंकर सिंह यांनी आता हिंदी भाषकांच्या मेळाव्यात हा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे. अनुच्छेद 370 बाबत काँग्रेसची भूमिका जनतेमध्ये स्पष्ट नसल्याने, हा मुद्दा दरवर्षी 37 हजार कोटींच्या बजेटसह मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण कृपाशंकर यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते सार्वजनिकपणे सांगू लागले आहेत की कलम 370 ला विरोध करणारे भारतीय असू शकत नाहीत.

भाजपची नजर उत्तर भारतीयांच्या मतांवर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्याप्रकारे जन-आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मराठी भाषिक मते भाजपच्या बाजूने जमवायला सुरुवात केली आह. तसेच कृपाशंकर सिंह यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर भारतीयांना भगव्या ब्रिगेडमध्ये एकत्र करणे सुरू केले आहे. अलीकडेच उत्तर भारतीय मोर्चाच्या चौपाल कार्यक्रमात याच भागात ते म्हणाले की अन्यायाविरुद्ध बंड करणे हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. उत्तर भारतीय समाजही बंडखोर होऊ शकतो, पण तो कधीही बेईमान होऊ शकत नाही.

सूर्य उगवेल, अंधार दूर होईल आणि मुंबई महानगरपालिकेत कमळ बहरेल: राजहंस सिंह
उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने संपूर्ण मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या चौपाल कार्यक्रमाचे संयोजक माजी आमदार राजहंस सिंह म्हणाले की, सूर्य उगवेल, अंधार नाहीसा होईल आणि जनतेच्या ताकदीने मुंबई मनपामध्ये कमळ खुलेल. एवढेच नाही तर येत्या काळात मुंबई पालिकेत भाजपचा महापौर होईल. त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि उत्तर भारतीय समाजाला आवाहन केले की शिवसेनेने भाजपच्या पाठीत वार करण्याचे काम केले आहे. 2022 च्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या ईव्हीएम मशीनचे बटण दाबून त्याच्यावरील राग दूर करण्याचे काम करा.

भाजपचे 114 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दीष्ट आहे : मनीषा चौधरी
चौपाल कार्यक्रमाला संबोधित करत असताना भाजपच्या आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की, सध्या उत्तर मुंबईमधून भाजपचे 24 नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकांमध्ये उत्तर मुंबईत संपूर्ण मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर असेल. ते म्हणाले की, एकदा मुंबईच्या लोकांनी आणि विशेषतः उत्तर भारतीयांनी ठरवले की, त्यांना जय श्रीरामचा पक्ष हवा आहे, तेव्हाच भाजप मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 114 पेक्षा जास्त नगरसेवक जिंकण्याचे लक्ष साध्य करु शकेल. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी कामगारांना आवाहन केले की, जर त्यांना मुंबईचा पुढील महापौर उत्तर मुंबईतून बनवायचा असेल तर त्यांनी उत्तर मुंबईत जास्तीत जास्त जागा भाजपला द्याव्यात.

बातम्या आणखी आहेत...